PNE26W40310
अहिल्यानगर ः आनंदऋषीजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जतनबाई मानकचंदजी बोथरा यांच्या स्मरणार्थ बोथरा परिवार (पारस ग्रुप) यांच्या सहकार्याने आयोजित जनरल सर्जरी शिबिराचे उद्घाटन करताना मान्यवर.
आनंदऋषीजी हॉस्पिटल रुग्णसेवेचे आदर्श मॉडेलः पेमराज बोथरा
अहिल्यानगर, ता. ५ ः राष्ट्रसंत आचार्य श्री आनंदऋषीजी महाराज यांच्या प्रेरणेने उभे राहिलेले आनंदऋषीजी हॉस्पिटल हे केवळ उपचार करणारे रुग्णालय नसून, सेवाभाव, विश्वास आणि सामाजिक बांधिलकी यांचे जिवंत प्रतीक बनले आहे. सर्वसामान्य रुग्णांना परवडणाऱ्या दरात दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देत हे हॉस्पिटल आज रुग्णसेवेचे आदर्श मॉडेल ठरले आहे, असे प्रतिपादन बडीसाजन श्री संघाचे अध्यक्ष तथा उद्योजक पेमराज बोथरा यांनी केले.
जैन सोशल फेडरेशन संचालित आनंदऋषीजी हॉस्पिटल ॲण्ड मेडिकल रिसर्च सेंटरच्या वतीने राष्ट्रसंत आचार्य श्री आनंदऋषीजी महाराज यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त जतनबाई मानकचंदजी बोथरा यांच्या स्मरणार्थ बोथरा परिवार (पारस ग्रुप) यांच्या सहकार्याने आयोजित जनरल सर्जरी शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या शिबिराच्या माध्यमातून जयंतीनिमित्त आयोजित विविध आरोग्य शिबिरांना औपचारिक प्रारंभ झाला.
यावेळी संतोष बोथरा, सतीश बोथरा, मनीषा बोथरा, संगीता बोथरा, प्रतिभा बोथरा, प्रणेश बोथरा, रोनक बोथरा, गौरव बोथरा, रोहन बोथरा, प्रसन्ना बोथरा, प्रणित बोथरा, खुशक बोथरा, समीक्षा बोथरा, श्रेया बोथरा, दर्शना बोथरा, डॉ. वसंत कटारिया, सतीश लोढा, मानकचंद कटारिया, डॉ. आशिष भंडारी, प्रकाश छल्लाणी, निखिलेंद्र लोढा, सुभाष मुनोत, वसंत चोपडा, जनरल सर्जन डॉ. भास्कर जाधव, डॉ. महेश घुगे, डॉ. प्रवीण मुनोत, डॉ. विवेक भापकर आदी उपस्थित होते. निखिलेंद्र लोढा म्हणाले की, उद्योग क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर यश संपादन करतानाच बोथरा परिवाराने तन, मन आणि धनाने आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या सेवाकार्यात मोलाचे योगदान दिले आहे. हॉस्पिटलच्या उभारणीपासून ते विस्तारापर्यंत, घरकुल योजना, २५ व्हिजन सेंटरची स्थापना आणि सावेडी येथील नव्या रुग्णालयाच्या उभारणीतही या परिवाराचा मोठा सहभाग आहे. मानकचंदजी बोथरा यांनी दिलेला समाजसेवेचा वारसा नवीन पिढी समर्थपणे पुढे नेत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रणित बोथरा म्हणाले की, स्वतःच्या प्रगतीबरोबर समाजाचीही प्रगती झाली पाहिजे, हा आजोबा मानकचंदजी बोथरा यांचा संस्कार आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. त्याच विचारातून नवीन पिढी सामाजिक उत्तरदायित्वाची परंपरा पुढे नेत आहे. या जनरल सर्जरी शिबिरात ११० रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. अपेंडिक्स, इन्ग्वायनल हर्निया, हायड्रोसिल आदी शस्त्रक्रिया गरजू रुग्णांसाठी सवलतीच्या दरात करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आशिष भंडारी यांनी केले, तर प्रकाश छल्लाणी यांनी उपस्थितांचे आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.