किसन वीर कारखान्यावर
बुधवारी महाआरोग्य शिबिर
कवठे, ता. २१ : माजी खासदार (कै.) लक्ष्मणराव पाटील यांच्या ८८ व्या जन्मदिनानिमित्त बुधवारी (ता. २५) भुईंज येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर अभिवादन कार्यक्रम व महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
या निमित्ताने सकाळी १० वाजता वाळवा (जि. सांगली) येथील कथाकथनकार-वक्ते जयवंतराव आवटे यांचे मार्गदर्शन होणार असून, अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मदत व पुनर्वसनमंत्री तथा कारखान्याचे चेअरमन मकरंद पाटील राहणार आहेत, तर खासदार नितीन पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. कारखाना, राष्ट्रवादी काँग्रेस, तसेच विविध संस्थांच्या वतीने सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत होणाऱ्या या शिबिरात संपूर्ण शरीर तपासणी, अत्याधुनिक मशिनद्वारे मोफत ईसीजी, बीपी, हिमोग्लोबिन, मधुमेह तपासणी करण्यात येणार आहे. हृदयविकार, मेंदूविकार, किडनी विकार, हर्निया, मूळव्याध, पित्ताशयातील खडे, अपेंडिक्स, तसेच विविध शस्त्रक्रियांबाबत तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन केले जाणार आहे. यासोबतच एचआयव्ही, टीबी, सिफिलीस, कावीळ आदी संसर्गजन्य आजारांची तपासणी, तोंड, घसा, फुफ्फुस, गर्भाशय व इतर कॅन्सर तपासणी, मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू निदान शिबिर, तसेच अल्पदरात चष्मे वाटप करण्यात येणार आहे. रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन उपाध्यक्ष प्रमोद शिंदे, कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.