राहू, ता. २९ : आमदार राहुल कुल यांच्या वाढदिवसानिमित्त केडगाव (ता. दौंड) येथील श्री वरदविनायक हॉस्पिटलच्यावतीने नागरिकांसाठी मोफत आरोग्य महाशिबिराचे २५ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत आयोजन केल्याची माहिती श्री वरद विनायक हॉस्पिटलचे डॉ. सचिन भांडवलकर, डॉ. राजश्री भांडवलकर यांनी दिली.
या उपक्रमांतर्गत अनन्या डायग्नोस्टिक सेंटरमध्ये सोनोग्राफीवर ५० टक्के सवलत आहे. तसेच, २५ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान एक्स-रे, एमआरआय आणि लॅब तपासण्यांवरही ५० टक्के सवलत उपलब्ध आहे. २७ ऑक्टोबर रोजी डॉ. सचिन चेमटे पाटील यांच्याकडून मेंदू व मणक्यांसंदर्भातील तपासणी व ओपीडी सेवा मोफत दिली आहे. २८ ऑक्टोबर रोजी डॉ. तुषार भांडवलकर यांच्याकडून अस्थिरोगविषयक मार्गदर्शन करण्यात आले. ३० ऑक्टोबर रोजी डॉ. मिलिंद चाकणे यांच्याकडून पोटाच्या विकारांसंदर्भात मोफत ओपीडी सेवा दिली जाणार आहे. ३१ ऑक्टोबर रोजी डॉ. सॅम्यूअल भगत व डॉ. दिव्या निंबाळकर यांच्याकडून फिजिओथेरपीविषयक सेवा, १ नोव्हेंबर रोजी डॉ. श्रीयश दराडे यांच्याकडून हृदयरोगविषयक मोफत ओपीडी सल्ला दिला जाणार आहे. हृदयविकारासंदर्भातील तपासणीसाठी आधुनिक २डी ECHO मशीनद्वारे तपासणीच्या दरात ५० टक्के सवलत देणार आहे. ३० ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टी विनामूल्य केल्या जातील. या सेवांसाठी आवश्यक वैद्यकीय पात्रता व अटी हॉस्पिटलमध्ये तपासून घेणे आवश्यक आहे.
शिबिरात विविध प्रकारच्या हाडांच्या, तसेच मूतखड्यांच्या शस्त्रक्रियांसाठी आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना योजनांच्या नियमानुसार उपचारांचा लाभ मिळवून दिला जाईल. त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री वरद विनायक हॉस्पिटलच्यावतीने डॉ. सचिन भांडवलकर, डॉ. अशोक बनसोडे, डॉ. राजश्री भांडवलकर, डॉ. अलोक बनसोडे, डॉ. गोविंद डोंगरे यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.