MGV26B16854
सिद्धेश्वर आवताडे
---
सिद्धेश्वर आवताडे यांच्या
वाढदिनानिमित्त आरोग्य सप्ताह
मंगळवेढ्यात विविध आजारांची मोफत तपासणी
मंगळवेढा, ता. ३१ : खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त सरकार परिवार व आवताडे हॉस्पिटल यांच्या वतीने १ ते ७ नोव्हेंबरदरम्यान ‘महाआरोग्य सप्ताहा’चे आयोजन करण्यात आले आहे. वाढदिवसानिमित्त हार-तुरे व सत्कारावरील अनावश्यक खर्च टाळून दुष्काळी परिस्थितीत नागरिकांच्या आरोग्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या सप्ताहात सात दिवसांत सात आरोग्यविषयक उपक्रम होणार आहेत. १ नोव्हेंबरला रक्तदान शिबिर, २ नोव्हेंबरला डॉ. धवल आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली अस्थिरोग तपासणी व उपचार शिबिर होईल. ३ नोव्हेंबरला डॉ. आदिन चोपडे व दक्षता हॉस्पिटल, सांगोला यांच्या सौजन्याने मूत्ररोग निदान शिबिर, तर ४ नोव्हेंबरला डॉ. सुजित शिवशरण यांच्या माध्यमातून कान, नाक व घसा तपासणी शिबिर होईल.
५ नोव्हेंबरला डॉ. महेश कोडलकर यांच्या मार्गदर्शनाखाली जनरल सर्जरीविषयक तपासणी, ६ नोव्हेंबरला डॉ. तृषाल यादव व टेके आय हॉस्पिटल, सांगली यांच्या सौजन्याने नेत्र तपासणी, तर ७ नोव्हेंबरला डॉ. सुनील पवार यांच्या माध्यमातून हृदयरोग तपासणी शिबिर होणार आहे. नागरिकांनी या शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन सरकार मित्र परिवाराने केले आहे. या उपक्रमासाठी खरेदी-विक्री संघ, कृषी उद्योग संघ, कृषी उत्पन्न बाजार समिती व व्यापारी परिश्रम घेत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.