‘साई एशियन’मध्ये मोफत
हृदयरोग तपासणी शिबीर
अहिल्यानगर, ता. १८ : पुण्यातील रूबी हॉल क्लिनिकतर्फे गुरुवारी (ता.२१) मोफत हृदयरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर नगर शहरातील तारकपूर येथील साई एशियन हॉस्पिटलमध्ये दुपारी २ः३० ते ३ः३० यावेळेत होईल.
या शिबिरात ग्रँट मेडिकल फाउंडेशन, रुबी हॉल क्लिनिक, पुणे येथील हृदयरोग तज्ज्ञ रुग्णांची तपासणी करून मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती सिनियर मॅनेजर संतोष दसासे यांनी दिली. नगरमध्ये दर महिन्याला तिसऱ्या गुरुवारी कार्डियाक ओपीडी सेवा दिली जाते.
सध्याच्या काळात हृदयविकारावर अधिक परिणामकारक उपचार शक्य झाले असून, याठिकाणी हृदयरोगतज्ज्ञ रुग्णांची तपासणी व उपचारांसाठी उपलब्ध असतात. छातीत दुखणे, दम लागणे, अस्वस्थ वाटणे अशी लक्षणे असलेल्या रुग्णांनी या शिबिरात आवर्जून तपासणी करून घ्यावी. नगरमधील शिबिरासाठी नाव नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.