shivbhojan thali
shivbhojan thali esakal
पुणे

पुणे : मोफत शिवभोजन थाळी आता ३० सप्टेंबरपर्यंतच मिळणार

सकाळ वृत्तसेवा

पुणे - कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्यामुळे राज्य सरकारकडून निर्बंधही शिथिल करण्यात येत आहेत. त्यामुळे मोफत शिवभोजन थाळीही ३० सप्टेंबरपर्यंतच मिळणार आहे. त्यानंतर येत्या एक ऑक्टोबरपासून शिवभोजन थाळीचा दर पूर्ववत दहा रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, शिवभोजन थाळीचीही संख्या कमी करण्यात येणार आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे अनेकांना रोजगार गमवावा लागला. व्यवसाय बंद असल्यामुळे मजूर, कामगारांचे हाल सुरू होते. त्यामुळे राज्य सरकारने गरीब नागरिकांसाठी शिवभोजन थाळी दहा रुपयांऐवजी मोफत देण्याचा निर्णय घेतला होता. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील ३९ शिवभोजन केंद्रांवर दररोज सहा हजारांहून अधिक थाळ्या मोफत देण्यात येत होत्या.

मोफत शिवभोजन थाळी योजनेची अंतिम मुदत १४ सप्टेंबर होती. परंतु राज्य सरकारने पुढील आदेश येईपर्यंत मोफत शिवभोजन थाळी मोफत देण्याचे आदेश अन्नधान्य वितरण विभागाला दिले होते. या संदर्भात राज्य सरकारने मंगळवारी (ता. २८) आदेश जारी केले. त्यानुसार यापुढे मोफत शिवभोजन थाळी बंद होणार आहे.

थाळीचीही संख्याही घटणार

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात शिवभोजन थाळीच्या संख्येतही दीडपट वाढ केली होती. ३९ केंद्रांच्या माध्यमातून दररोज ६ हजारांहून अधिक नागरिकांना मोफत थाळी देण्यात येत होती. आता थाळींची संख्याही पूर्ववत करण्यात येणार आहे. त्यानुसार दररोज सुमारे साडेचार हजार शिवभोजन थाळींचे वितरण करण्यात येईल. तसेच, पार्सल सुविधाही बंद करण्यात येणार असल्याची माहिती अन्नधान्य वितरण अधिकारी सचिन ढोले यांनी दिली.

पुणे, पिंपरी चिंचवड शहरातील स्थिती :

शिवभोजन केंद्र : ३९

वाटप थाळ्यांची संख्या (१ जानेवारी २०२० पासून आजअखेर) : १८ लाख ४० हजार

मोफत थाळीचा कालावधी १५ एप्रिल ते ३० सप्टेंबर २०२१

थाळीतील पदार्थ : प्रत्येकी ३० ग्रॅमच्या दोन चपात्या, एक वाटी भाजी, एक वाटी वरण आणि १५० ग्रॅम भात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RR vs PBKS Live Score: संजू सॅमसनने जिंकला टॉस! राजस्थान-पंजाबने प्लेइंग-11 मध्ये केले मोठे बदल

Kalyan Loksabha election 2024 : कल्याणच्या सभेत मोदींनी उपस्थित केला सावरकरांचा मुद्दा; राहुल गांधींना दिलं 'हे' चॅलेंज...

Nashik Fraud Crime : दिले 5 लाख, उकळले 18 लाख! अवैध सावकारीचा आणखी एक गुन्हा दाखल

Rohit Sharma: 'मी जेव्हा भारतीय संघाचा कर्णधार झालो, तेव्हा...', रोहितनं नेतृत्व अन् निवृत्तीवर केलं मोठं भाष्य

PM Modi : ''...त्या बैठकीला मी हजर होतो, मनमोहन सिंहांना मी विरोध केला होता'', मोदी नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT