पुणे

पुरंदरमधील पात्र शेतकऱ्यांना मिळणार सोयाबीनचे बियाणे

CD

​सासवड, ता.२३ : सासवड (ता. पुरंदर) येथे पुरंदर तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघात सोयाबीनचे बियाणे उपलब्ध झाले आहे. महाडीबीटी पोर्टलवर एप्रिल-मे महिन्यात ऑनलाइन अर्ज करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना हे बियाणे मोफत मिळणार आहे.
खरेदी विक्री संघाला कृषी विभागाकडून प्राप्त झालेल्या यादीनुसार, तालुक्यातील ७८ पात्र शेतकऱ्यांना एकूण २४०० किलो सोयाबीन बियाणे वितरित केले जाणार आहे. या प्रक्रियेसाठी कृषी विभागाने पात्र शेतकऱ्यांची नावे खरेदी-विक्री संघाला कळविली आहेत.
ज्या शेतकऱ्यांनी महाडीबीटीवर ऑनलाइन अर्ज केले होते, त्यांनी बियाणे घेण्यासाठी सासवड येथील मार्केट यार्ड आवारातील खरेदी-विक्री संघाच्या कार्यालयात संपर्क साधावा. बियाणे घेण्यासाठी येताना शेतकऱ्यांना आधार कार्ड, ​फार्मर आयडी आणि सातबारा उतारा ही कागदपत्रे आवश्यक आहेत. याबरोबरच भुईमुगाचेही बियाणे उपलब्ध असून पुढील काही दिवसांत बाजरी आणि मुगाचे बियाणे उपलब्ध होणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी आॅनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे.
​याबाबत माहिती देताना संघाचे अध्यक्ष प्रकाश खेडेकर यांनी सर्व पात्र शेतकऱ्यांना वेळेत कार्यालयात येऊन बियाणे घेण्याचे आवाहन केले आहे. यावेळी उपाध्यक्ष मदनराव चव्हाण, संचालक उल्हासराव जाधव, भूषण ताकवले, बाजीराव इनामके, व्यवस्थापक प्रल्हाद लांडगे आणि मोनाली गोंडाळे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Mohibullah Ansari : कोण आहेत मोहिबुल्लाह अंसारी? अमेरिकेत मिळणार ‘एशियन हिरो अवॉर्ड’; जाणून घ्या IPS अधिकाऱ्याचा प्रेरणादायी प्रवास

Ladki Bahin Yojana August 2026 Installment GR : लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट हप्त्याचा GR आला; खात्यात 1,500 जमा होणार की 3,000 शासन निर्णयात नेमकं काय?

Vinod Kambli ने ठाण्याच्या हॉस्पिटलमधून पोस्ट केला Video; प्रकृतीबाबत सांगायचं सोडून, काय बोलतोय ऐका; नेटकरी म्हणाले...

Latest Marathi News Live Update : लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल; २२ तासांपासून विसर्जन मिरवणूक, थोड्याच वेळात बाप्पाला निरोप

IND vs WI: विराट कोहली अन् शुभमन गिल यांच्यात 'कड्याकाचं' भांडण? स्टार फलंदाज कर्णधाराला बोट दाखवत बडबडला Video Viral

SCROLL FOR NEXT