स्वातंत्र्य चळवळीसंदर्भातील
पुस्तकांचे साताऱ्यात प्रदर्शन
सातारा, ता. २० ः येथील श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज (थोरले) नगरवाचनालयात ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त आणि राष्ट्रीय ग्रंथपाल दिनानिमित्त भारतीय स्वातंत्र्य चळवळीवर आधारित पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
या पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्रेया गोखले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरवाचनालयाचे अध्यक्ष अमित कुलकर्णी, कार्यवाह वैदेही कुलकर्णी, लेखक पद्माकर पाठकजी, ग्रंथपाल रूपा मुळे, गौतम भोसले, शालेय ग्रंथपाल तसेच येथील हिंदवी पब्लिक स्कूल आणि दातार शेंदुरे इंग्लिश मीडियम स्कूलचे विद्यार्थी उपस्थित होते.
भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास, स्वातंत्र्यसैनिकांचे योगदान, विविध आंदोलने आणि स्वातंत्र्य चळवळीतील महत्त्वपूर्ण घटनांवर आधारित विविध पुस्तके या प्रदर्शनात मांडण्यात आली होती. विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास पुस्तकांच्या माध्यमातून जवळून अनुभवता यावा आणि वाचनाची आवड निर्माण व्हावी, हा या उपक्रमामागील उद्देश आहे. यावेळी विद्यार्थ्यांना नगरवाचनालयाच्या बालविभागाचे सदस्यत्व देण्यात आले. वैदेही कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. कार्यवाह प्रकाश शिंदे यांनी आभार मानले. यावेळी शालेय ग्रंथपालांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये अनंत इंग्लिश स्कूलच्या अंजली साळुंखे, न्यू इंग्लिश स्कूलचे मच्छिंद्रनाथ शेळके, दातार शेंदुरे इंग्लिश स्कूलच्या सविता भोसले तसेच हिंदवी पब्लिक स्कूलच्या ज्योती सुतार यांचा श्रीमती गोखले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास नगरवाचनालयाचे समिती सदस्य पद्माकर पाठकजी, गौतम भोसले तसेच विद्यार्थी उपस्थित होते.
W43584
सातारा ः नगरवाचनालयात भारतीय स्वातंत्र्य चळवळीसंदर्भातील पुस्तकांच्या उद्घाटनप्रसंगी श्रेया गोखले, अमित कुलकर्णी, वैदेही कुलकर्णी, पद्माकर पाठकजी, रूपा मुळे, गौतम भोसले व इतर मान्यवर.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.