Seven-Mantra 
पुणे

ताज्या भाज्या, त्याही घरपोच...ग्राहक आनंदला! 

सकाळवृत्तसेवा

‘सेव्हन मंत्राज'कडून शेतकऱ्यांच्या बांधावरून थेट घरपोच भाजीपाला सेवा सुरू 
पुणे - ‘‘कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आज मला एकदम ताजी भाजी आणि दर्जेदार फळे घरपोच मिळाली. त्याचे पॅकिंग अत्यंत चांगले आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने केले होते. आम्हाला हवा तसा ताजा भाजीपाला मिळाला याचा मनापासून आनंद आहे,'' अशा शब्दांत मंगळवारी ‘ॲग्रोवन’च्या पुढाकारातून सुरु झालेल्या ‘सेव्हन मंत्रा'च्या भाजीपाला आणि फळे शेतकऱ्यांच्या बांधावरून थेट घरात पोहोचविण्याच्या उपक्रमाचे ग्राहकांकडून स्वागत करण्यात आले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे आणि पिंपरी-चिंचवड या शहरांमध्ये मंगळवारी शेतकऱ्यांचा ताजा माल बांधावरून थेट ग्राहकांच्या घरी पोचविण्यात आला. या उपक्रमाला पहिल्याच दिवशी उर्त्स्फूत प्रतिसाद मिळाला. आज सकाळी सात वाजल्यापासून सेव्हन मंत्राच्या भाजीपाला आणि फळांच्या बास्केट ग्राहकांच्या घरी अत्यंत सुरक्षितरीत्या पोहोचविण्यात आल्या. "सेव्हन मंत्रा' या ब्रॅंण्डकडून दोन्ही शहरांमध्ये वितरणाची चोख व्यवस्था करण्यात आली होती. शेतकऱ्यांकडूनच शास्त्रशुद्ध पद्धतीने पॅकिंग करून आणलेला सर्व माल मास्क, हॅण्डग्लोज घातलेल्या प्रतिनिधींनी घरोघर पोहोचवला. आज वितरित करण्यात आलेल्या मालाची आगाऊ नोंदणी करण्यात आली होती.

भाजीपाला आणि फळे तोडणीपासून २४ तासांच्या आत घरोघरी वितरित करण्यात येणार असल्याने त्याच्या ताजेपणाबद्दल गृहिणींनी विशेष दाद दिली. भाजीपाल्यासाठी वेगवेगळे चार पर्याय उपलब्ध करून देण्यात आल्याने ग्राहकांना त्यांच्या सोयीनुसार मालाची निवड करता आली. अनेक गृहनिर्माण सोसायटींमध्ये मोठ्या संख्येने या योजनेला प्रतिसाद दिला. www.sevenmantras.com या वेबसाइटवर जाऊन पुढच्या मालासाठी नोंदणी केली. आठवड्याच्या दर मंगळवार, गुरुवार आणि रविवारी मालाचे वितरण करण्यात येणार आहे. त्यासाठी ग्राहकांनी दोन दिवस अगोदर बुकिंग करावे लागणार आहे. आज योजनेचा शुभारंभ होताच मोठ्या संख्येने पुढच्या दिवसासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांनी बुकिंग केले.

गेल्या पंधरा वर्षापासून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या दैनिक ऍग्रोवनचा हा उपक्रम असल्याने "ऍग्रोवन'च्या विश्‍वासार्हतेमधून आणि कसोटीतून भाजीपाला आणि फळांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे हा मालाचा दर्जा अत्यंत चांगला असल्याबद्दलच्या प्रतिक्रिया प्रत्यक्ष बास्केट खरेदी केलेल्या ग्राहकांनी व्यक्त केल्या.

"भाज्या अतिशय ताज्या, स्वच्छ होत्या. पॅकिंग खूप आवडले. कांदे, बटाटे आणि लसूण हे बास्केटही आवडले. कोथिंबिरीचे देठ कापून चिखल दूर केला हे खूप छान होते. सर्वांत महत्त्वाचे डिलिव्हरीसाठी आलेले प्रतिनिधी मास्क, हॅण्डग्लोज घालून सॅनिटाइज होऊन आले होते. त्यामुळे हे बास्केट मला मनापासून आवडले '' 
- नेहा हळबे, गृहिणी 

पहिली पेटी मंगलमूर्ती चरणी
"सकाळ ॲग्रोवन'च्या "सेव्हन मंत्राज' या घरपोच भाजीपाला आणि फळे विक्रीच्या उपक्रमाचा मंगळवारपासून प्रारंभ करण्यात आला. याअंतर्गत भाजीची पहिली पेटी चिंचवड येथील मंगलमूर्ती चरणी अर्पण करण्यात आली. चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्‍वस्त मंदार देव महाराज यांनी ही पेटी स्वीकारली. यावेळी "सकाळ'च्या पिंपरी विभागाचे मुख्य जाहिरात व्यवस्थापक मिलिंद भुजबळ, चंद्रशेखर जोशी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS U19: ज्युनियर सेहवाग अर्धशतकापासून हुकला, अन्वय द्रविड्हचीही बॅट शांत; यशवर्धन चौहानने मात्र ऑस्ट्रेलियाविरुद्ध ठोकलं शतक

Walchandnagar News : बुलेटच्या सायलेन्सर वरुन फिरविला रोलर....; पोलिसांनी बुलेटचा फट् -फट् आवाज केला बंद...

Tata Chairman Salary: Tata Sons च्या चेअरमनला किती पगार मिळतो? नोएल टाटांच्या विरोधानंतर पद पुन्हा चर्चेत; आकडा पाहून धक्का बसेल!

Akola News : जिल्हाधिकाऱ्यांनी सोडले शेतकऱ्यांना वाऱ्यावर; महाबीज प्रशासनाकडून माहिती देण्यास नकार, एमडींनीही केले हात वर

Ai+ Nova 2 Power 5G भारतात लाँच! 16,999 रुपयांत खरेदीची संधी...पाहा फीचर्स अन् ऑफर्स!

SCROLL FOR NEXT