पुणे

बंबाचे सोडा, प्यायलाही पाणी नाही

अनंत काकडे

चिखली - कर्मचाऱ्यांना बसण्यास खोली नाही, अग्निशामक बंबात सोडा कर्मचाऱ्यांना पिण्यासाठी पुरेसे पाणी नाही. तीन बाजूने गायरान, साप आणि भटक्‍या कुत्र्यांची भीती, त्यामुळे जीव मुठीत धरून रात्र काढावी लागते. अग्निशामक केंद्र असल्याचा फ्लेक्‍स फाटल्याने ते शोधूनही सापडत नाही. सुविधांचा अभाव असलेले हे तळवडे येथील हे अग्निशामक केंद्राला अनेक समस्यांनी ग्रासले आहे. 

महापालिकेने दोन वर्षांपूर्वी तळवडे येथे अग्निशामक केंद्र सुरू करण्यात आले. देहू-आळंदी रस्त्यावर तळवडे येथे एमआयडीसीच्या गायरानच्या जागेत हे अग्निशामक केंद्र आहे. एका अधिकाऱ्यासह १९ कर्मचारी या केंद्रात काम करतात. अग्निशामक बंबाच्या पार्किंगसाठी शेड उभारण्यात आले आहे.

मात्र, जवानांना बसण्यासाठी खोली उभारण्याऐवजी पूर्वीच्या जकात नाक्‍याची पत्र्याची खोली देण्यात आली आहे. या खोलीत बसून हे कर्मचारी उकाड्याने हैराण होतात. त्यामुळे समोरच्या झाडांखाली या कर्मचाऱ्यांना बसावे लागते. अग्निशामक केंद्राच्या तिन्ही बाजूने गायरानातील दाट झाडी आहेत. साप, विंचू, भटकी कुत्री यांचा मुक्त वावर असतो. सध्या वापरात असलेल्या जकात नाक्‍याच्या खोलीत साप घुसल्याचे प्रकार वारंवार घडतात. त्यामुळे जीव मुठीत धरून रात्र काढावी लागते. दिवसभर बसण्यासाठी व रात्री आराम करण्यासाठी किमान एखादी सुरक्षित रूम आवश्‍यक असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. या ठिकाणी सकाळी एकदाच पिण्याचे पाणी येते. पाणी साठविण्यासाठी टाकी नाही. पाण्याच्या वेळी कर्मचारी कामावर गेले असतील, तर त्यांना पाणी मिळत नाही. मग तिन्ही शिफ्टच्या कर्मचाऱ्यांना पाण्यासाठी दिवसभर भटकंती करावी लागते. नको त्या ठिकाणी कोट्यवधीचा खर्च करणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिकेने आग असो की इतर आपत्तीचा दिवस असो. 

रात्री वर्दी मिळाली तत्पर असणाऱ्या अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची थोडी तरी काळजी घ्यावी, अशी नागरिकांची मागणी आहे.

अग्निशामक कर्मचाऱ्यांची सुरक्षा महत्त्वाची आहे. अग्निशामक केंद्र असूनही कोणत्याच सुविधा नाहीत. अग्निशामक केंद्र उभारण्यासाठी वारंवार पाठपुरावा केला आहे. प्रथम ते काम हाती घेण्याचे स्थापत्य विभागाला सांगण्यात आले आहे.
- प्रवीण भालेकर, नगरसेवक

तळवडे येथील अग्निशामक केंद्र तात्पुरत्या स्वरूपात जकातनाक्‍याच्या जागेत सुरू केले आहे. स्थानिक नगरसेवकांच्या मागणीनुसार आता या केंद्रासाठी निविदा काढण्यात आली आहे. मात्र, ही जागा एमआयडीसीची आहे. त्यामुळे सर्व प्रक्रिया आणि परवानग्या पूर्ण झाल्यावर तात्पुरत्या स्वरूपाचे, मात्र सर्व सुविधा असलेले अग्निशामक केंद्र उभारण्यात येईल.
- दिलीप गावडे, अधिकारी, अग्निशामक दल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG, Lord's ODI: इंग्लंडला RO-KO नडले, पण अखेर भारतीय संघाचा प्रयत्न तोकडे पडले! यजमानांनी विजयासह मालिकाही जिंकली

IND vs ENG: रोहित शर्माच्या शतकात LORD शार्दुल ठाकूरचं मोठं योगदान, पण कसं? जाणून घ्या नेमकं गुपित

ENG vs IND: Rohit Sharma चा लॉर्ड्सवर 'हिटमॅन' अवतार; शतक ठोकत इतिहास घडवला, गिलसोबतही केली विक्रमी भागीदारी

Parliament March Row: परवानगी मागितली नाही, दिलीही नाही; कलम १६३ लागू, संसद मार्चला दिल्ली पोलिसांचा स्पष्ट नकार

FIFA World Cup Final चा फिव्हर भारतातही! तीन राज्यातील शाळांना थेट सरकारी सुट्टी जाहीर

SCROLL FOR NEXT