पुणे

हीच खरी मैत्री! उपचारांसाठी 2 दिवसांत जमा केले 30 लाख

महेश जगताप

स्वारगेट : मैत्री ही फक्त करायची नसते तर ती अनुभवायची, निभवायची असते. या कोरोनाच्या काळात रक्ताचे नातेवाईक सुद्धा जवळ येत नाहीत. मित्र मात्र अनेक वेळा मदतीला आल्याची अनके उदाहरणे आपणाला पाहायला मिळतील. पोलीस उपनिरीक्षक भाईदास माळी यांना कोरोनावर मात केल्यानंतर सुद्धा म्युकरमायकोसिस या दुर्मिळ आजाराने गाठले. पण या आजाराला तोंड देणे सोपे नव्हते. यासाठी खर्च येणारे होता तब्बल पस्तीस ते चाळीस लाख, हा खर्च एकूणच भाईदास हे खचले. आत्ता इतके पैसे आणायचे कोठून असा प्रश्न त्यांच्यासमोर होता. मात्र आपला मित्र खचू नये तो जिवंत राहावा यासाठी भाईदास यांच्या तीस ते चाळीस मित्रांनी तब्बल तीस लाख रुपये गोळा केले. भाईदास यांना मुंबईच्या ग्लोबल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून उपचार केले. त्यामुळे भाईदास यांची प्रकृती स्थिर आहे. मित्रांनी आपल्या मित्राला वाचवल्यामुळे सर्व स्तरातून यांचे कौतूक होत आहे.

भाईदास माळी हे ११३ बॅचमधील पोलीस उपनिरीक्षक ते २०१० -१२ साली एकाग्रता या अभ्यासिकेत अभ्यासाला होते. अतिशय मनमिळावू असणारे भाईदास यांची २०१५- १६ साली उपनिरीक्षक पदी निवड झाली. मुळचे धुळ्याचे असणारे भाईदास सध्या ते बुलढाणा जिल्ह्यात किनगाव येथे सेवा बजावत आहेत. आपली सेवा बजावत असताना त्यांना दोन वेळा कोरोना झाला पण, त्यांनी दोन्ही वेळेस कोरोनावर मात केली पण काही दिवसानंतर त्यांच्या नाकातून आणि दाढेतून पू येऊ लागला. सुरवातीला घरगुती उपचार केले मात्र नंतर पुणे येथे एका हॉस्पिटलमध्येही ऍडमिट करून शस्त्रक्रियाही करण्यात आली पण पुन्हा त्रास होऊ लागल्याने नाकाची आणि दाढेची सर्जरी करण्याकरिता मंबई येथे ग्लोबल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले. मात्र पस्तीस ते चाळीस लाख रुपये सांगितल्याने इतका खर्च कोठून करायचा असा प्रश्न या कुटुंबासमोर उभारला होता अशी माहिती भाईदास यांचे मित्र पोलीस उपनिरीक्षक विजय गीते यांनी दिली .

घरची परिस्थिती फार काही ठीक नसल्याने ११३ क्रमांक पोलीस उपनिरीक्षक ट्रेनिंगच्या सिंहस्थ बॅचने आपल्या बॅचमेटसाठी आजारपणाची माहिती मिळताच दोन दिवसात तीस लाखाचा मोठा निधी गोळा केला त्याचबरोबर भाईदास यांच्याबरोबर आजपर्यंत काम केलेल्या सहकाऱ्यांचा ही निधी गोळा करण्यात खूप मोठा वाटा आहे. इतका मोठा निधी उभा करू शकलो व आमच्या मित्राला आम्हाला मदत करता आली याचे आम्हाला समाधान आहे अश्या भावना भाईदास यांच्या सहकाऱ्यांनी व्यक्त केल्या .

''पोलीस दलातील प्रत्येक सहकाऱ्याला अश्या अचानक उद्भवलेल्या अडचणींना तोंड द्यावे लागतेच. मग अश्या वेळी त्या कुटुंबाची फार फरफट होते. कोठून आणायचे इतके पैसे त्याचबरोबत पैसे जमावण्याकरिता वेळही कमी असतो. त्यामुळे ही अडचण ओळखून शक्य तितक्या सहकार्यांना मदत करण्याचा प्रयत्न असतो. आमचा सहकारी भाईदास माळी यांना मदत करू शकलो याचे समाधान आहे. सर्व पोलीस दलातील सहकाऱ्यांनी आपली काळजी घ्यावी.''

- रणजित पाटील, डीवायएसपी (इस्लामपूर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT