पुणे

मैत्री दिनीच गमावला जिवलग मित्र !

CD

बालेवाडी, ता. ४ : मैत्री दिनाच्या दिवशी जिवलग मित्राला शुभेच्छा देण्यासाठी पाठविलेल्या संदेशानंतर मित्राच्या निधनाची बातमी समजल्याने एका मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला. ग्रेव्हस लिमिटेडचे माजी कर्मचारी राजेश काळे यांचे निधन झाल्याची माहिती त्यांचे पुत्र अनिकेत यांनी दिली.
१९९३ ते २००१ या काळात ग्रेव्हस लिमिटेडमध्ये एकत्र काम करणाऱ्या मित्रांमध्ये राजेश काळे, विजय शिंगारे, उत्तम पवार, धर्मा, एदलाबादकर, फराह शेख आदींचा जिवाभावाचा मित्रपरिवार होता. कामाच्या धावपळीतही त्यांनी मैत्रीचे नाते जपले. पुढे प्रत्येकाची वाट वेगळी झाली असली, तरी संपर्क कायम होता. दोन वर्षांपूर्वी फराह शेख यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व मित्र पुन्हा एकत्र आले होते.
मैत्रीदिनी राजेश काळे यांच्या निधनाची बातमी समजताच सर्व मित्रांना मोठा धक्का बसला. त्यांच्या आठवणींना उजाळा देताना मित्रांनी, ‘‘मित्रांना वेळ द्या, त्यांच्याशी संवाद साधा आणि त्यांना भेटत राहा; कारण कोणती भेट शेवटची ठरेल हे सांगता येत नाही,’’ अशी भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MCOCA: पुण्यात विषारी दारूमुळे २१ जणांचा बळी घेणाऱ्या टोळीवर ‘मकोका’; राज्य गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई

Daund News : बनावट कुणबी जात प्रमाणपत्र प्रकरणात दौंडचे नगरसेवक रोहित पाटील यांचे सदस्यत्व रद्द

Food Safety Crackdown: कऱ्हाडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; दोन हॉटेल सील, तीन हॉटेलांवर दंडात्मक हालचाली

Latest Marathi News Live Update : श्रेया कालरा हिने नेटफ्लिक्सचा 'कॅप्टिव्ह' रिअ‍ॅलिटी शो जिंकला

ती सगळ्यांसमोर पाणउतारा करायची... अशोक शिंदेनी सांगितलं सेटवर कशा वागायच्या अलका कुबल; पहाटे साडे पाचला...

SCROLL FOR NEXT