nikhil-gaytonde 
पुणे

Video : झाडांवर अंडी घालणारा बेडूक

नीला शर्मा

तो बेडूक शिट्टीसारखा आवाज काढतो. याची मादी पाण्याऐवजी दगड व झाडांच्या पानांवर अंडी घालते. नेइटीबॅट्राकस प्रकारचा हा बेडूक सावंतवाडीजवळच्या अंबोली या निसर्गरम्य ठिकाणी आढळतो. निखिल गायतोंडे या तरुण संशोधकानं केलेल्या अभ्यासामुळे या बेडकाबद्दलची माहिती समोर आली आहे.

मूळ पुणेकर असलेला निखिल गायतोंडे हा गेले चार पावसाळे अंबोलीच्या जंगलात जातो. तेथील दुर्मीळ प्रजातीच्या बेडकांचं रात्री निरीक्षण करत नोंदी घेतो. तो म्हणाला, ‘‘पीएचडीसाठी मी करत असलेल्या अभ्यासाचा एक भाग म्हणजे हा वैशिष्ट्यपूर्ण बेडूक. संपूर्ण जगात दोनच ठिकाणी नेइटीबॅट्राकस प्रकारचा बेडूक आढळतो. पैकी पश्‍चिम घाटातील अंबोली परिसर आणि अमेरिकेतील कोस्टारिका प्रांतात. सुमारे ४० अब्ज वर्षांपासून हा प्राणी पृथ्वीवर आहे. इतर बेडकांपेक्षा हा वेगळा आहे. प्रजननाच्या काळात नर एकमेकांशी भांडून, कुस्ती खेळून आपली हद्द स्थापन करतात. मादीला आकर्षित करण्यासाठी शिट्टीसारखा आवाज काढतात. माद्या वेगवेगळ्या हद्दींतून भटकत योग्य वाटलेला नर निवडतात. मादीने स्वतःहून स्पर्श करीपर्यंत नर जागीच बसून असतो.’’

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

निखिल याने असंही सांगितलं की, मादी वेगवेगळ्या नरांबरोबर राहून प्रत्येकाच्या हद्दीत थोडी-थोडी अंडी घालते. पुढची पिढी जगावी यासाठी नैसर्गिक प्रेरणेनं मादी हे करते. एवढंच नाही; तर काही अंडी खोटी व काही अंडी फलित होऊ शकणारी घालते. याचं कारण, या अंड्याचं भक्षण करणाऱ्या दोन प्रकारच्या सापांना गुंगारा देणं. फलित होणाऱ्या अंड्यांच्या जवळ साप येऊ लागताच त्याच्या कंपनांनी अंड्यातील पिलू सावध होऊन पाण्यात उडी घेतं. हा बेडूक देवराई किंवा जुन्या जंगलातच आढळतो. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच तो बाहेर येतो. पावसाळा संपला की, जमिनीत गडप. पाच वर्षांपूर्वी दुष्काळ पडला होता. तेव्हा ही प्रजाती दिसलीच नव्हती. यंदा पाऊस पडणार, हे यांना कसं कळत असेल, हे गूढ अभ्यासकांनाही आहे. याचा अभ्यास करून पावसाचं भाकीत व र्तवता येईल का, या दृष्टीने प्रयत्न करता येतील, असं मत निखिल याने व्यक्त केलं. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK Head Coach: जहीर खानकडे चेन्नई सुपर किंग्सची धुरा! IPL 2027 साठी माजी भारतीय स्टारची हेड कोचपदी नियुक्ती, CSKचा मोठा निर्णय

मालमत्ता ४ कोटींची, मग १३ कोटींची रोल्स रॉयस कुठून आली? मैथिली ठाकूरच्या व्हिडीओवरून CAचा सवाल, चौकशीची मागणी

Bihar viral video case: जमुई अल्पवयीन मुलीचं छेडछाड प्रकरण! राष्ट्रीय महिला आयोग आक्रमक, पोलीस महासंचालकांना कठोर निर्देश

Lohara Crime : पतीने धारदार शस्त्राने वार करून पत्नीचा केला खून; हल्ल्यानंतर पतीने स्वतःवर वार करून पोलिस ठाण्यात झाला हजर

Marathi News Live Updates: राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय, ५ दिवस पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT