from baramati 1500 maratha participate in mumbai protest maratha reservation manoj jarange  Esakal
पुणे

Maratha Reservation : मुंबईतील उपोषणासाठी बारामतीतून दीड हजारांवर वाहनांसह हजारो मराठा बांधव जाणार

मराठा आरक्षणाबाबत मुंबईत प्रजासत्ताक दिनापासून सुरु होणा-या उपोषणासाठी बारामती शहर व तालुक्यातून मोठ्या प्रमाणात मराठा बांधव सहभागी होणार

मिलिंद संगई, बारामती..

बारामती : मराठा आरक्षणाबाबत मुंबईत प्रजासत्ताक दिनापासून सुरु होणा-या उपोषणासाठी बारामती शहर व तालुक्यातून मोठ्या प्रमाणात मराठा बांधव सहभागी होणार आहेत. बारामतीत शुक्रवारी (ता. 16) झालेल्या पत्रकार परिषदेत या बाबत माहिती देण्यात आली.

मुंबईत 26 जानेवारी रोजी आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषण करणार आहेत. त्यांना साथ देण्यासाठी बारामती तालुक्यातील प्रत्येक गाव व वाडीवस्तीवरुन दहा ते बारा चार चाकी वाहने व सामानासाठी एक ट्रॅक्टर किंवा टेम्पो अशी प्रत्येक गावाने तयारी केल्याचे नमूद करण्यात आले.

बारामती तालुक्यातून एकूण दीड हजारांवर चार चाकी वाहने व सामानाचे टेम्पो 24 जानेवारी रोजी सकाळी सात वाजता छत्रपती शिवाजी महाराज उद्यानापासून श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून श्री क्षेत्र मोरगावच्या दिशेने निघतील. मोरगाव मध्ये आसपासचे बांधव एकत्र होऊन सर्व जण देहूरोडकडे निघणार आहेत.

आंदोलनासाठी येणाऱ्या बारामती तालुक्यातील सर्व समाज बांधवांच्या जेवणाची सर्व व्यवस्था ही मराठा क्रांती मोर्चा, बारामती यांच्या वतीने करण्यात येणार आहे. आंदोलनासाठी जाणाऱ्या समाज बांधवांसाठी वैद्यकीय प्रथमोपचार साहित्य सोबत घेण्यात येणार आहे. आंदोलन हे मनोज जरांगे पाटील यांचे सूचनेप्रमाणे होणार असून ते शांततेच्या मार्गानेच होणार आहे.

बारामती तालुक्यातील जे समाज बांधव आंदोलनासाठी येणार आहेत ते सर्वजण जरांगे पाटलांच्या आदेशाशिवाय आंदोलन ठिकाणापासून परत येणार नाहीत. आंदोलनाला निघाल्यापासून परत येईपर्यंत कोणीही कोणत्याही अफवांना बळी पडू नये. जो पर्यंत मनोज जरांगे पाटील स्वतः एखादी गोष्ट स्वतःच्या तोंडाने सांगत नाहीत. तोपर्यंत कोणीही कुठल्याही निष्कर्षाला येवू नये, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चा, बारामती यांच्या वतीने करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ujani Dam: निम्माही पाऊस नाही, तरी उजनी धरण फुल्ल! १६ दरवाजे उघडले, भीमेत ४० हजार क्युसेक विसर्ग

Saransh Jain: वडिलांनी मुलासाठी कॅन्सरच लपवला! आज तोच खेळाडू टीम इंडियात; भावूक कहाणी डोळे पाणावेल

Latest Live Updates Marathi : सरकारने आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत- आदित्य ठाकरे

World Hepatitis Day 2026: फॅटी लिव्हर आणि हेपॅटायटिस एकाच वेळी असू शकतात का? डॉक्टर काय सांगतात, जाणून घ्या

Ahilyadevi Holkar Loan Waiver : बोटांचे ठसे उमटत नाहीत? चिंता नको! कर्जमाफीच्या आधार प्रमाणीकरणासाठी प्रशासनाने दिला 'हा' महत्त्वाचा पर्याय, जाणून घ्या प्रक्रिया

SCROLL FOR NEXT