Loksabha Election Esakal
पुणे

Loksabha Election: मविआकडून पुणे लोकसभेच्या जागेवर काँग्रेसचा दावा? निवडणूक लढवण्यासाठी 'हा' आमदार इच्छुक

Loksabha Election: आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. राज्यातील सर्व जागांसाठी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. राज्यातील सर्व जागांसाठी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. जागावाटपाबाबत पक्षांनी चर्चा सुरू केल्या आहेत. तर गेल्या काही दिवसांपासून राज्यातील मतदारसंघावर दावा सांगण्यास सुरूवात झाली आहे. अशातच पुणे लोकसभेच्या जागेवर काँग्रेस पक्षाने दावा सांगितल्याच्या चर्चा सुरू आहेत.

लोकसभा निवडणुकीसाठी पुण्यातून आमदार रवींद्र धंगेकर इच्छुक असल्याची माहिती समोर आली आहे. दिल्लीत वरिष्ठ नेत्यांकडे त्यांनी याबाबतची इच्छा व्यक्त केली आहे. आज दिल्लीत लोकसभा समन्वयकांची बैठक पार पडली. या बैठकीसाठी रवींद्र धंगेकर आज दिल्लीत आहेत.

आज काँग्रेस मुख्यालयात भेट घेवून त्यांनी इच्छा व्यक्त केली आहे. दिल्लीत भेट घेतल्याने रवींद्र धंगेकर लोकसभा निवडणुकीच्या कामाला लागणार आहेत. काँग्रेसचे वरिष्ठ नेते पुण्यात येणार आहेत.

तर जागावाटपाबाबत बोलताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभेत आज काँग्रेसच्या जागा जास्त आहेत; काँग्रेस जास्त जागांवर जिंकूही शकते, असं म्हटलं होतं. त्यामुळे जागावाटपाबाबत चर्चा झाल्यानंतर पुणे लोकसभेच्या जागेवर काँग्रेसला संधी मिळण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांना मोठी अपेक्षा; 'ही' मागणी पूर्ण झाली तर दीर्घकालीन प्रतीक्षा संपणार

IPS बुशरा बानो कोण? इन्शाल्लाह म्हटल्यानं वाद, तक्रारीनंतर तडकाफडकी बदली

Solapur News : वित्त आयोग निधी वाटपात पालकमंत्र्यांची मनमानी; जिल्हा परिषद सदस्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे केली तक्रार

IPL 2027 Auction कुठे होणार? मागील काही वर्षांत दुबई, जेद्दाह, अबु धाबी येथे झाला होता लिलाव; यावर्षी...

Marathi News Live Updates : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री शिंदेंच्या निवासस्थानी, गणपतीचं घेतलं दर्शन

SCROLL FOR NEXT