pune-marketyard 
पुणे

Coronavirus: पुण्यात फळे-भाजीपाला, फूल बाजार दोन दिवस बंद

सकाळवृत्तसेवा

मार्केट यार्ड - कोरोना विषाणूमुळे मार्केट यार्डातील फळे-भाजीपाला, कांदा-बटाटा बाजार शुक्रवारी (ता. २०) बंद राहणार आहे. तसेच शनिवारी साप्ताहिक सुटी आहे. त्यामुळे शुक्रवार आणि शनिवारी हे विभाग बंद करण्याचा निर्णय बाजारातील संघटनांनी घेतला आहे. तसेच फूल बाजार येत्‍या शुक्रवार, शनिवार आणि रविवारी बंद राहणार आहे.

मार्केट यार्डात बुधवारी श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड अडते असोसिएशन आणि कामगार संघटनांची सर्वसाधारण सभा घेण्यात आली. या सभेत शुक्रवार व शनिवार (ता. २०, २१) फळे-भाजीपाला व कांदा-बटाटा बाजार कोरोना व्हायरसच्या संकटामुळे संपूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

तसेच पुढील आठवड्यापासून प्रत्येक बुधवारी व शनिवारी ३१ मार्चपर्यंत साप्ताहिक सुटी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या दोन सुट्यांदिवशी संपूर्ण बाजार स्वच्छतेकरिता बंद राहणार असल्याची माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड अडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ यांनी  माहिती दिली. 

अडते असोसिएशनचे विलास भुजबळ, कामगार युनियनचे संतोष नागंरे, संपत धोंडे, अनंता कोडले, अप्पासाहेब कोरापे, सुधीर जाधव, अजय घुले, युवराज काची, राजू भालेराव, सचिन पायगुडे, नाथ खैरे उपस्थित होते. फूलबाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मार्केट यार्ड फूल बाजार असोसिएशनचे अध्यक्ष अरुण वीर यांनी दिली. दरम्यान, गूळ भुसार विभाग साप्ताहिक सुटी वगळता (रविवार) सुरळीत सुरू राहणार असल्याचे चेंबरचे उपाध्यक्ष अशोक लोढा यांनी सांगितले.

निर्जंतुकीकरणाची मागणी
बाजारात शेतकरी, ग्राहक, अडते, व्यापारी, टेम्पोचालक, हमाल, महिला कामगार यांची संख्या लक्षणीय आहे. बाजारात साधारण २० हजार लोक या ठिकाणी रोज भेटी देतात. तरही अद्याप बाजारात निर्जंतुकीकरण करण्यात आलेले नाही. बाजार समितीने याबाबत गंभीर होऊन निर्जंतुकीकरण करावे, अशी मागणी कामगार युनियनचे सचिव संतोष नांगरे यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK: सूर्यकुमारचा अपमान करणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूच झाला ट्रोल; आता म्हणतोय, आफ्रिदीला कुत्रा म्हणणाऱ्या इरफान पठाणला...

दीड वर्षही झालं नाही आणि झी मराठीची आणखी एक मालिका घेणार निरोप? अभिनेत्रीच्या भावुक पोस्टमुळे चर्चेला उधाण

6G India : भारतात लवकरच सुरू होणार 6G इंटरनेट; IIT हैदराबादच्या विद्यार्थ्यांनी बनवला प्रोटोटाइप, हे नेमकं आहे तरी काय? जाणून घ्या

Junnar News : जुन्नर तालुक्यातील रस्त्यांना कायदेशीर ओळख; सांकेतिक क्रमांक देणारे बोरी बुद्रुक पहिले गाव

Kirit Somaiya : किरीट सोमय्यांचा आरोप खरा ठरला? मालेगाव बनावट कागदपत्र प्रकरणाचा तपास वेगवान

SCROLL FOR NEXT