हारुण बागवान : PNE26W48482
भरधाव टेम्पोच्या धडकेत
टमटममधील फळविक्रेता ठार
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. ९ : बुधवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास दोड्डी पेट्रोल पंपाजवळ भरधाव टेम्पोच्या धडकेत टमटममधील ५२ वर्षीय फळ व भाजीपाला विक्रेता ठार झाला आहे. हारुण बाबुलाल बागवान (रा. संगमनगर, सोलापूर) असे मृताचे नाव आहे.
सोलापूर बाजार समितीतून नेहमीप्रमाणे भाजी आणि फळे खरेदी करून हारुण बागवान बोरामणीच्या दिशेने जात होते. सोलापूर शहरातील विविध भागात आणि बोरामणी परिसरात ते भाजी व फळे विकत होते. ९ सप्टेंबर रोजी पहाटे पाच वाजता हारुण बागवान हे टमटममधून संगमनगरहून बोरामणीच्या दिशेने जात होते. यावेळी दोड्डी पेट्रोल पंपाजवळ त्यांच्या टमटमला मागून भरधाव आलेल्या टेम्पोने जोरात धडक दिली. यात हारुण बागवान यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की, टेम्पोच्या धडकेत टमटम रस्त्यावर सुमारे १०० फूट फरफटत जाऊन उलटले. टमटममधून हारुण बागवान बाजूला पडले होते. गंभीर जखमी हारुण यांना रुग्णवाहिकेतून सिव्हिल हॉस्पिटलला दाखल केले; पण त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे.
चौकट
हारुण बागवान यांचा कुटुंबाला हातभार
मृत हारुण बागवान यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, तीन मुली असा परिवार आहे. ते अनेक वर्षांपासून फळे व भाजीपाला विक्री करून कुटुंबाला हातभार लावत होते. त्यांच्या मृत्यूची खबर मिळताच त्यांच्या कुटुंबीयांनी, नातेवाईकांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गर्दी केली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.