Metro
Metro 
पुणे

वाढीव एफएसआयबाबत संभ्रम

सकाळवृत्तसेवा

पुणे - मेट्रो मार्गाऐवजी स्टेशनच्या परिसरात चार एफएसआय देण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला खरा, परंतु मेट्रो स्टेशनचे नकाशे अद्याप उपलब्ध झालेले नाहीत. त्यामुळे हरकती कशावर नोंदवायच्या, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. मेट्रो स्टेशनच्या मध्यापासून पाचशे मीटरचा परिसर ग्राह्य धरावा की स्टेशनच्या सीमाभिंतीपासून असे अनेक प्रश्‍न उपस्थित झाल्याने याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

पुणे महापालिकेकडून वनाज ते रामवाडी आणि पिंपरी ते स्वारगेट मेट्रो मार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी निधी उभारण्यासाठी मेट्रो मार्गाच्या दोन्ही बाजूस पाचशे मीटरच्या परिसरात चार एफएसआय देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. जानेवारी २०१७ च्या विकास आराखड्यास राज्य सरकारने मंजुरी देताना त्यास मान्यता दिली होती. परंतु, ऐनवेळी मार्गाऐवजी स्टेशनच्या परिसरात चार एफएसआय द्यावा अशी शिफारस महापालिकेने राज्य सरकारला केली. राज्य सरकारनेही त्यास मान्यता दिली. तसे आदेश काढून त्यावर हरकती-सूचना मागविण्याचे आदेश दिले आहेत.

राज्य सरकारकडून आठ मार्चला या संदर्भातील आदेश काढण्यात आले. त्यावर तीस दिवसांत नगर रचना संचालकांकडे हरकती सूचना दाखल करावयाच्या आहेत.

वीस दिवसांचा कालवधी उलटून गेला आहे. हरकती दाखल करण्याची मुदत संपायची वेळ आली, तरीदेखील मेट्रो स्टेशनचे नकाशे प्रसिद्ध करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे स्टेशन नेमक्‍या कोणत्या परिसरात येणार आहे, त्यांची लांबी रुंदी काय असणार आहे, असे अनेक प्रश्‍न या निमित्ताने उभे राहिले आहे. परिणामी हरकती-सूचना दाखल करण्यात नागरिकांना अडचणी येत आहेत.

जबाबदारी महापालिकेची
यासंदर्भात नगर रचना संचालक कार्यालयाशी संपर्क साधला असता, नाव न देण्याच्या बोलीवर तेथील अधिकारी म्हणाले, ‘‘स्टेशनचे नकाशे उपलब्ध करून देण्याची संपूर्ण जबाबदारी ही पुणे महापालिकेची आहे.
राज्य सरकारने जे आदेश काढले आहेत त्यामध्ये मेट्रो मार्ग आणि त्यावरील स्टेशनचे नकाशे महापालिकाने द्यावे, असे म्हटले आहे. त्यांच्याकडून अद्याप ते नकाशे मिळालेले नाहीत. त्यामुळे ते आम्ही प्रसिद्ध करू शकलो नाही.’

मेट्रो स्टेशन कुठे होणार आहे, याचे नकाशे अद्याप प्रसिद्ध करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे हरकती कशावर घेणार असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. राज्य सरकारने हरकती-सूचना दाखल करण्यासाठी दिलेली मुदत संपत आली आहे. सरकारने ही मुदत वाढवून द्यावी.
- सुधीर कुलकर्णी, अध्यक्ष, नागरी हक्क समिती

मेट्रो स्टेशनचे नकाशे तयार करण्याचे काम पूर्ण झाले आहे. राज्य सरकारकडे ते मान्यतेला पाठविण्यात येणार आहेत. त्यांची मान्यता घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे लवकरच ते प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.
- प्रशांत वाघमारे, नगर अभियंता, पुणे महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha : संजय पाटील विरुद्ध विशाल पाटील यांच्यात 'टशन'; माजी मंत्र्यांच्या भूमिकेमुळे निवडणूक बनली लक्षवेधी

Sunidhi Chauhan: भर कॉन्सर्टमध्ये प्रेक्षकानं बॉटल फेकून मारली; पण ती डगमगली नाही, सुनिधी चौहाननं दिलं सडेतोड उत्तर

Elon Musk Scam : इलॉन मस्कने म्हटलं 'आय लव्ह यू', अन् तरुणीवर झाला कर्जाचा डोंगर.. काय आहे प्रकरण?

'आम्ही सुद्धा थोडं क्रिकेट खेळलोय...' भारताच्या सर्वश्रेष्ठ फलंदाजाने विराटवर ओढले ताशेरे, चॅनलला देखील दिला इशारा

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

SCROLL FOR NEXT