Construction sakal
पुणे

पुणे : बिल्डरांना दिलासा; प्रीमियम FSIJ शुल्क भरण्यास मुदतवाढ

बांधकाम व्यवसायिकांना प्रीमियम "एफएसआय'च्या शुल्कात 50 टक्‍के सवलत देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : बांधकाम व्यवसायिकांना प्रीमियम "एफएसआय'च्या शुल्कात 50 टक्‍के सवलत देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. ज्या बांधकाम व्यावसायिकांनी (Construction Businessman) ३१ डिसेंबरपूर्वी प्रस्ताव दाखल केला त्यांना आता ३१ जानेवारीपर्यंत पैसे भरण्यासाठी मुदत देण्यात आली आहे.

कोरोनामुळे गेल्यावर्षी लॉकडाऊन (Lockdown) असल्याने बांधकाम साइट बंद होत्या, बांधकाम मजूर पुणे सोडून गावी निघून गेले, त्यामुळे बांधकाम उद्योगापुढे मोठे आव्हान निर्माण झाले होते. मात्र, याच काळात राज्य सरकारने बांधकाम विभागाला सावरण्याची संधी म्हणून नोंदणी शुल्कात एक टक्क्याची कपात केली.

तसेच बांधकाम परवानगी घेताना प्रिमियम एफएसआयच्या शुल्कात ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय १४ जानेवारी २०२१ रोजी घेतला. त्यासाठी ३१ जानेवारी २०२१ पर्यंतची मुदत दिली होती. एकट्या डिसेंबर महिन्यात ४०० कोटी रुपये महापालिकेला या शुल्कातून मिळाले आहेत.

३१ डिसेंबर पर्यंत मोठ्या प्रमाणात प्रस्ताव दाखल झाल्याने अशा प्रस्तावांना शुल्क भरण्यासाठी १४ जानेवारी पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय कार्यालयात ५० टक्के उपस्थिती आहे, त्याचा परिणाम कामकाजावर झाला असल्याने अद्याप अनेक व्यवसायिकांना शुल्क भरता आले नाही. त्यामुळे ३१ जानेवारी पर्यंत पुन्हा मुदत वाढवली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 4th T20I : भरवशाच्या म्हशीला टोणगा! भारताच्या फलंदाजांनी माती खाल्ली, श्रेयस अय्यरच्या खेळीने लाज वाचवली

Ashadhi Wari : आनंदोत्साहात पालखी सोहळा पुण्यनगरीमध्ये

IND vs ENG 4th T20I : पुन्हा तेच... वैभव सूर्यवंशी IPL समजून खेळायला गेला अन् जोफ्रा आर्चरने पुन्हा कार्यक्रम केला... Video

Sakal Impact : ई-सकाळच्या बातमीचा परिणाम; वेळ नदीवरील खचलेला पूल रातोरात दुरुस्त, वाहतूक पुन्हा सुरळीत

राज्यातील लाखो झोपडपट्टीवासीयांना दिलासा! २०११ पूर्वीच्या झोपड्यांना कायदेशीर मान्यता; महायुती सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT