पुणे

पाच महिन्यानंतर पुण्यात पेट्रोलची किंमत घसरली, पाहा नवे दर

सकाळन्यूजनेटवर्क

Fuel prices drop ; गेल्या काही दिवसांपासून स्थिर असणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये आज, बुधवारी घसरण झाली आहे. गेल्या महिन्यात पेट्रोलच्या किंमतीमध्ये उच्चांकी वाढ झाली होती. त्यानंतर आता पहिल्यांदाच पेट्रोलच्या किंमतीमध्ये कपात झाली आहे. पुण्यात तर तब्बल पाच महिन्यानंतर पेट्रोलच्या किंमती घसरल्या आहेत.  पुण्यात दोन ऑक्टोबर २०२० रोजी अखेरचं पेट्रोल स्वस्त झालं होतं. त्यानंतर मात्र, वारंवार पेट्रोलच्या किंमतीमध्ये वाढ होती गेली. पण २४ मार्च २०२१ रोजी पुण्यात पेट्रोलच्या दरात १७ पैशांनी घसरण झाली. आज, बुधावारी पुण्यात पेट्रोलची किंमत प्रतिलीटर ९७ रुपये २ पैसे इतकी आहे. डिझेलची किंमत प्रतिलीटर १८ पैशांनी घसरुन ८६ रुपये ७० पैसे इतकी झाली आहे.  

२७ फेब्रुवारी रोजी पुण्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये अखेरची वाढ झाली होती. त्यावेळी पेट्रोलची किंमत प्रतिलीटर ९७ रुपये १९ पैसे इतकी झाली होती. तर डिझेलची किंमत ८६ रुपये ८८ पैसे झाली होती. तेव्हापासून तब्बल २४ दिवसांपर्यंत पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर होते. मात्र, आज पहिल्यांदाच पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत घसरण झाली आहे. यापुढेही पुढील काही दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये घसरण होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरच्या किंमतीत आणि कच्च्या तेलांमध्ये झालेल्या घसरणीमुळे पुढील काही दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती घसरण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.  

देशात सर्वाधिक पेट्रोलचे दर भोपाळमध्ये असून 99 रुपये प्रतिलिटर इतका दर आहे. त्याखालोखाल मुंबईत 97 रुपये 40 पैसे इतक्या दराने पेट्रोलची विक्री होत आहे. तर सर्वात कमी चंदिगढमध्ये 87 रुपये 56 पैसे प्रति लिटर इतक्या दराने विक्री होत आहे. बेंगळुरूत 94 रुपये तर पाटणामध्ये 93 रुपये 31 पैसे दराने पेट्रोल विकलं जात आहे. भोपाळमध्ये डिझेल 89 रुपये 58 पैसे प्रति लिटर इतकं आहे. तर मुंबईथ 88 रुपये 42 पैसे आणि चंदिगढमध्ये 81 रुपये प्रति लिटर इतकी किंमत आहे.

पेट्रोल, डिझेलच्या किंमतीमध्ये दररोज सकाळी सहा वाजता बदल होतो. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात एक्साइज ड्युटी, डिलर कमीशन आणि इतर करांमुळे दुप्पट वाढ होते. परदेशी चलनाची किंमत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑइलच्या किंमतीनुसारच पेट्रोल आणि डिझेलचा दर दररोज बदलत असतो. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagarpalika Election Date: या तारखेला नगरपालिकेची झुंज! स्थानिक स्वराज्यच्या पहिल्या टप्प्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर, Time Table बघा अन् लागा तयारीला...

Duplicate Voters List : दुबार मतदाराच्या नावापुढे डबल स्टार, नगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी आयोगाने उचलले मोठे पाऊल, कशी घेणार दक्षता ?

Latest Marathi News Live Update : शेतकरी व्यापाऱ्यांमध्ये तुंबळ हाणामारी

'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत होणार 'या' अभिनेत्याची एंट्री; प्रोमो पाहिल्यावर प्रेक्षकांनीच सांगितलं नाव

Ganesh Naik : १५०० बिबट वनतारामध्ये स्थलांतरित व १००० पिंजरे खरेदीसाठी १० कोटी रुपये निधी मंजूर करण्याचा निर्णय

SCROLL FOR NEXT