पुणे

पोलिसांवर केला होता हल्ला, मग तीन वर्षांनी असे सापडले कचाट्यात

राजेंद्र सांडभोर

राजगुरूनगर (पुणे) : तीन वर्षांपूर्वी गावठी दारूच्या भट्टीवर छापा टाकायला गेलेल्या पोलिसांवर हल्ला झालेल्या गुन्ह्यातील फरारी तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी (ता. 16) पहाटे जेरबंद केले. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे तीन वर्षांपूर्वी शिरगावच्या (ता. खेड)  हद्दीतील विठ्ठलवाडी येथील गावठी दारूच्या भट्टीवर छापा टाकण्यासाठी खेड पोलिस ठाण्यातील पथक गेले होते. याच ठिकाणी महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू तस्करीसाठी आणला आहे, अशीही माहिती पोलिसांना होती. त्यावेळी छापा टाकायला गेलेल्या पोलिसांवर जमावाने जीवघेणा हल्ला केला होता. त्या हल्ल्यात सात पोलिस अधिकारी व कर्मचारी जखमी झाले होते. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या प्रकरणात अनेकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यातील संशयित आरोपी, रघुनाथ दामू वाघ (वय ४५), संतोष रघुनाथ वाघ (वय २१) आणि सखाराम दामू वाघ (वय ४७) हे तिघे जण तेव्हापासून फरारी होते. सध्या ते गावी आल्याचे पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला समजले. त्यावरून आज पहाटेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रवींद्र मांजरे, पोलिस हवालदार शंकर जम, सुनील जावळे, शरद बांबळे, दीपक साबळे, अक्षय जावळे यांच्या पथकाने शिरगावच्या विठ्ठलवाडी वस्तीवर छापा मारला. पूर्वीचा अनुभव लक्षात घेता, स्थानिकांचा विरोध होणार हे गृहीत धरून गुन्हे शाखेच्या पथकाने युक्ती आणि कौशल्य वापरले आणि संशयित आरोपींच्या राहत्या घरातून तिनही आरोपींना ताब्यात घेऊन खेड पोलिसांच्या स्वाधीन केले.

Edited by : Shivnandan Baviskar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: छठपूजा आणि मराठी-परप्रांतीय वादावर राज ठाकरेंचा निशाणा, शिवरायांचा उल्लेख करत म्हणाले...

Dog Bite Treatment: कुत्रा चावल्यानंतर लक्षणांची वाट पाहू नका; तातडीने उपचार घ्या, रिम्समधील तज्ज्ञांचा सल्ला

Microsoft: जगभरात मायक्रोसॉफ्टची सेवा विस्कळीत! ७४ देशांमधील आऊटलुक, टीम्स आणि कोपायलट ठप्प; कोट्यवधी वापरकर्त्यांना फटका

NCP Merger: पडद्यामागे मोठ्या घडामोडी! सुनेत्रा पवारांच्या कार्यालयातून आमदारांना फोन?, पुण्यात पार्थ पवारांनी बोलावली तातडीची बैठक

Latest Marathi News Live Update : बुलढाण्यात दुष्काळाच्या झळा

SCROLL FOR NEXT