Fulfill Dreams of building redevelopment sakal
पुणे

पुणे : इमारत पुनर्विकासाची ‘ड्रीम्स’ करा पूर्ण!

स्टार्टअपद्वारे तंत्रज्ञान विकसित; देशातील एकमेव उपक्रम असल्याचा दावा

सनील गाडेकर, सकाळ वृत्तसेवा

पुणे - शहरातील जुन्या रहिवासी इमारती आणि सोसायटी (सहकारी गृहरचना संस्था) यांच्या पुनर्विकास प्रक्रियेत गतिमानता आणि पारदर्शकता आणण्यासाठी येथील एका स्टार्टअपने तंत्रज्ञान विकसित केले आहे. ‘ड्रीम्स रिडेव्हलपमेंट’ असे या स्टार्टअपचे नाव आहे. मराठवाडा मित्र मंडळाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (एमएमसीओई) इनक्युबेशन सेंटर अंतर्गत हे स्टार्टअप कार्यरत आहे. वित्त क्षेत्रातील तब्बल दोन दशकांच्या अनुभवानंतर हैदराबाद येथील इंडियन स्कूल ऑफ बिझनेसचे माजी विद्यार्थी असलेले आणि पहिल्याच प्रयत्नात चार्टर्ड अकाउंटंट ही पदवी मिळविणारे सीए एस. लक्ष्मीनारायणन आणि सीए हरिश मेनन यांनी या स्टार्टअपची सुरवात केली.

अशी सुचली कल्पना

कोथरूड येथील आयडियल कॉलनीत वास्तव्यास असताना स्टार्टअपचे संस्थापक सीए एस. लक्ष्मीनारायणन यांची रहिवासी इमारत २०२० मध्ये पुनर्विकास प्रक्रियेतून जात होती. त्यांच्या सोसायटीला विविध विकसकांनी ४० ते ४५ टक्के अतिरिक्त क्षेत्रफळाची व्यवहार्यता दिली होती. सीए लक्ष्मीनारायणन यांनी विकसकांच्या प्रस्तावाचा, इमारतीच्या जागेचा, संबंधित नियमांचा सखोल अभ्यास केला आणि यामागील गणिताची उकल केली. हा अभ्यास केल्यावर, नियमांच्या आधारे मागणी करता येण्याजोग्या अतिरिक्त क्षेत्राची गणना करण्यासाठी गणितीय मॉडेल मांडले. यानंतर, विकसकाकडून देण्यात येणारी ऑफर ७५ टक्क्यांपेक्षा जास्त होती, जी पुनर्विकास क्षेत्रातील सर्वात मोठी ऑफर होती. याबाबतची माहिती कळताच पुनर्विकासासाठी इच्छुक असलेल्या आसपासच्या परिसरातील काही गृहनिर्माण संस्थांनी त्यांना मार्गदर्शनासाठी विनंती केली. यातूनच हा उपक्रम सुरू करण्याची कल्पना सुचली.

स्टार्टअपची वैशिष्ट्ये

  • भारतातील हे एकमेव तंत्रज्ञान व्यासपीठ

  • या माध्यमातून माहिती तंत्रज्ञान, डाटा अ‍ॅनालिटिक्स आणि थेट सुविधेसह गतिमानता आणि पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न

  • या प्रवासाची सुरुवात डिसेंबर २०२० मध्ये झाली

  • याची मूळ संकल्पना ही संबंधित सोसायटी ‘फिजिटल’ (फिजिकल+डिजिटल) अनुभव देणे ही आहे

  • सोसायटींशी सुरुवातीपासूनच प्रत्यक्ष संवाद साधला जात असताना, ‘dreamsredeveloped.com’ या स्वरूपात डिजिटल प्लॅटफॉर्म ऑगस्ट २०२१ मध्ये सुरू करण्यात आला

  • शहरातील ४५ हून अधिक सोसायटी, २० हून प्रतिष्ठित विकसक, १५ पेक्षा जास्त वास्तुविशारद या व्यासपीठाशी जोडले गेले आहेत

  • प्रत्येक टप्प्यावर आवश्यक ती कायदेशीर सेवा प्रदान केली जाते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT