पुणे

मुळशी, राजगडमधील शाळांसाठी ३ कोटी ३० लाखांचा निधी मंजूर

CD

पौड, ता. ९ : जिल्हा वार्षिक योजनेतून मुळशी व राजगड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या १० प्राथमिक शाळांच्या इमारती कामासाठी व दुरुस्तीसाठी ३ कोटी ३० लाख ६७ हजार रुपये मंजूर झाल्याची माहिती आमदार शंकर मांडेकर यांनी दिली. या निधीमुळे शाळांचा चेहरामोहरा बदलण्यास मदत होणार आहे.
याबाबत आमदार मांडेकर यांनी सांगितले की, जिल्हा वार्षिक योजना सन २५-२६ मधील काही कामे रद्द झाल्याने नवीन कामे घेण्यात आली असून, त्यामध्ये मुळशी व राजगड तालुक्यातील १० शाळांचा समावेश सुधारणा व विशेष दुरुस्ती करणे यामध्ये करण्यात आला आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कामांना सुरुवात होणार आहे. निधी मंजूर झालेल्या शाळांची नावे पुढीलप्रमाणे (कंसात मंजूर निधी) मुळशी तालुका- भोईनी (१८ लाख ४५ हजार रुपये), आंदगाव (१७ लाख ३१ हजार रुपये), पाथरवाडी (२५ लाख ७१ हजार रुपये), मांदेडे (४० लाख ८ हजार रुपये), खेचरे (३५ लाख ६७ हजार रुपये), जांबे (५७ लाख ३१ हजार रुपये), मारुंजी (५५ लाख रुपये). धामणहोळ (१३ लाख ६१ हजार रुपये), राजगड तालुका- साखर (३५ लाख ९३ हजार रुपये), करंजावणे (३१ लाख ६० हजार रुपये).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Research Funding: पुणे-मुंबईसह देशातील संशोधकांना मोठी संधी; युरोपचे ९३.५ अब्ज युरोचे दार उघडणार!

Political Storm in Kolhapur : "हा मोर्चा गोकुळसाठी नव्हे तर प्रदेशाध्यक्षपदासाठी"; उच्च न्यायालयाच्या निकालानंतर मुश्रीफांचा सतेज पाटलांवर गंभीर आरोप

Kapil Sharma Show : "लाल मंच्युरियन पिले पड गये..."; महाराष्ट्राचे 'डॅशिंग' IAS अधिकारी तुकाराम मुंडे यांच्यावर सुनील ग्रोव्हरची भन्नाट कविता, VIDEO तुफान व्हायरल!

Climate Summit: जगाची चिंता वाढली! युद्ध आणि AIमुळे हवामान बदलाचे आव्हान झाले आणखी अवघड

Maharashtra Live News: वाचा देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT