कोंढवा खुर्द : जलवाहिनी आणि श्री गुरुनानक देवजी उद्यानाच्या लोकार्पणप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार चेतन तुपे, नगरसेविका नंदा लोणकर यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
कोंढवा खुर्द : जलवाहिनी आणि श्री गुरुनानक देवजी उद्यानाच्या लोकार्पणप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार चेतन तुपे, नगरसेविका नंदा लोणकर यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधी उपस्थित होते. 
पुणे

विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही - अजित पवार

सकाळवृत्तसेवा

पुणे/घोरपडी - ‘‘नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा, अखंडित वीज, रिंगरोड आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठासह विविध विकासकामांसाठी निधी देण्यात येत आहे. शहराच्या सर्वांगीण विकासाला निधी कमी पडू दिला जाणार नाही,’’ असे आश्वासन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी दिले. 

कोंढवा खुर्द येथे (प्रभाग क्र.२६) साडेचार किलोमीटर जलवाहिनी आणि श्री गुरुनानक देवजी उद्यानाच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार चेतन तुपे, नगरसेविका नंदा लोणकर आदी या वेळी उपस्थित होते.

पवार म्हणाले, ‘‘उद्याने ही शहरांची फुफ्फुसे आहेत. प्रदूषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनावर भर द्यायला हवा. त्याचबरोबर घनकचरा वर्गीकरण आणि विघटन करणे आवश्‍यक आहे. जागतिक दर्जाचा चित्रपट महोत्सवाच्या आयोजनासाठी सहकार्य करण्यात येत आहे.’’ महापौर मोहोळ, नगरसेविका लोणकर यांनी मनोगत व्यक्त केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT