chhatrapati Sambhaji Maharaj sakal
पुणे

संभाजी महाराजांच्या स्मारक विकासासाठी निधी देणार; आदित्य ठाकरे

तुळापूर आणि वढु बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक साकारण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यटनमंत्री ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयात नुकतीच विशेष बैठक घेण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

तुळापूर आणि वढु बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक साकारण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यटनमंत्री ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयात नुकतीच विशेष बैठक घेण्यात आली.

वाघोली - छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्या तुळापुरातील स्मारकासही (Memorial) निधी (Fund) देण्याचे आश्‍वासन पर्यावरण-पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी दिले असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कटके यांनी दिली.

तुळापूर आणि वढु बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक साकारण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यटनमंत्री ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयात नुकतीच विशेष बैठक घेण्यात आली. यामध्ये वढु बुद्रुक येथील स्मारकाच्या आराखड्यावर चर्चा होऊन 50 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निर्णयाचे स्वागत आहे. या अनुषंगाने तुळापुरातील स्थानिक ग्रामस्थांसह शंभुभक्‍तांच्या भावनांचा विचार करून तुळापूर येथील प्रस्तावीत स्मारकाच्या आराखड्यासही निधी मंजूर करण्यात यावा, अशी मागणी पर्यटनमंत्री ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे ज्ञानेश्‍वर कटके व माऊली शिवले यांनी केली.

ठाकरे हे पुणे भेटीवर आले असता कटके यांनी त्यांची भेट घेतली. तुळापुर ग्रामपंचायतीकडूनही यासंदर्भात निवेदन देण्यात आले आहे. सरपंच गुंफा इंगळे, उपसरपंच नवनाथ शिवले, सदस्य दत्तात्रय खैरे, शिवाजी शिवले, अर्चना पुजारी, सुवर्णा राऊत, सुनिता शिवले, सुरेखा शिवले, सुनिता नवनाथ शिवले यांनीही तुळापुरातील स्मारकाबाबत निधीची मागणी केली आहे. याबाबत तातडीने हालचाली करण्यात येतील, निधी मंजुरीबाबत प्रयत्न सुरू असल्याचे ठाकरे यांनी कटके यांच्यासह उपस्थितांना सांगितले.

तुळापूर येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी, त्यावर नतमस्तक होण्यासाठी दरवर्षी लाखो नागरिक येतात. विकास आराखडा तयार आहे. निधी उपलब्ध झाल्यावर त्वरित काम सुरू होईल. महाराजांच्या समाधीचे पावित्र्य जपून स्मारकाचे तसेच परिसराच्या विकासाचे काम तातडीने व्हावे ही सर्वांची इच्छा आहे.

- ज्ञानेश्‍वर कटके, शिवसेना जिल्हा प्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT