bahuli
bahuli  sakal media
पुणे

बहुली येथील जळीतग्रस्तांसाठी निधी मंजूर

निलेश बोरुडे

किरकटवाडी: बाहुली (ता.हवेली) येथील भगतवाडी मधील जळीतग्रस्त कुटुंबांसाठी पुणे जिल्हा परिषदेकडून प्रति कुटुंब 50 हजार रुपये निधी मंजूर झाला असून 22 कुटुंबांना याचा लाभ मिळणार असल्याची माहिती पुणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पूजा पारगे यांनी दिली. 22 कुटुंबांना निधी मंजूर झाल्याबाबतचे पत्र भगतवाडी येथे जाऊन पारगे यांच्या वतीने संबंधित कुटुंब प्रमुखांना देण्यात आले.

दि. 14 मार्च 2021 रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास भगतवाडी येथील सोळा घरे आगीत पूर्णपणे भस्मसात झाली. तसेच आजूबाजूच्या घरांचेही आगीमुळे नुकसान झाले. खासदार सुप्रिया सुळे यांच्या सूचनेनुसार पुणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पूजा पारगे, जिल्हा परिषद सदस्या अनिता इंगळे, माजी जिल्हा परिषद सदस्य नवनाथ पारगे यांनी तात्काळ घटनास्थळाची पाहणी केली व त्याच वेळी संबंधित कुटुंबांना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रती कुटुंब पन्नास हजार रुपये मदत मिळवून देण्याची घोषणा केली होती.

खासदार सुप्रिया सुळे, महिला व बालकल्याण समिती सभापती पूजा पारगे यांच्या प्रयत्नांना यश आले असून पुणे जिल्हा परिषदेकडून प्रति कुटुंब 50 हजार रुपये निधी मंजूर झाला आहे. मंगल नथू भगत, हिराबाई निवृत्ती भगत, रूपाली बाळू भगत, वैशाली विठ्ठल भगत, अनिता देवेंद्र कोंडेकर, सुमन दत्तात्रय कोंडेकर, गीता अजय कोंडेकर, अंजना नथु कोंडेकर, संगीता सुनील भगत, जनाबाई नारायण कोंडेकर, मनीषा सुरेश कोंडेकर, लिलाबाई बाळू भगत, ज्योती शिवाजी भगत, दिपाली हेमंत भगत, दिपाली ज्ञानेश्वर भगत, रंजना भरत भगत, सरूबाई वसंत भगत, लीला कैलास भगत, आशा किसन भगत, सरुबाई गोविंद भगत, नंदा एकनाथ भगत व छाया विठ्ठल भगत या लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यावर सदर मदतनिधी जमा होणार आहे.या लाभार्थ्यांच्या निधी मंजुरीचे पत्र भगतवाडी येथे जाऊन पुजा पारगे यांच्या वतीने संबंधितांना देण्यात आले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य नवनाथ पारगे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खडकवासला विधानसभा अध्यक्ष त्र्यंबक मोकाशी, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष शुक्राचार्य वांजळे,बंडु भगत व नागरिक उपस्थित होते.

पाहणी केली त्याच दिवशी प्रती कुटुंब पन्नास हजार मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न केले व त्या प्रयत्नांना यश आले.महिला कुटुंब प्रमुखांच्या खात्यामध्ये सदर मदतनिधी जमा होणार आहे, असं महिला व बालकल्याण समिती सभापती पूजा पारगे म्हणाल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virtual Campaign: अटक केलेल्या राजकीय नेत्यांना व्हर्च्युअल प्रचाराची परवनगी मागणारी याचिका हायकोर्टाने फेटाळली

Goldy Brar Death: सिद्धू मूसवाला हत्याकांडाच्या मास्टरमाईंडची अमेरिकेत गोळ्या झाडून हत्या

Bumble : आता 'लेडीज फर्स्ट' नाही, तर पुरूषांनाही मिळणार समान संधी.. बम्बल डेटिंग अ‍ॅपने केली मोठी घोषणा!

Salman Khan : गोळीबार प्रकरणातील आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू ; गळफास घेऊन आयुष्य संपवण्याचा केला होता प्रयत्न !

China Highway Collapsed: चीनमध्ये भीषण दुर्घटना! हायवे कोसळल्यानं 19 ठार, डझनभर जखमी

SCROLL FOR NEXT