पुणे

तकलादू शोरूमचे इमले धोकादायक (व्हिडिओ)

ज्ञानेश सावंत, सचिन बडे,

पुणे -  फुरसुंगी आणि उरुळी देवाची गावातल्या कापड बाजारात नटलेल्या साड्यांच्या शोरूमभोवती आगीच्या झळा गडद असतानाच इथल्या बाजारात आणखी एका धोक्‍याची भीती आहे; ती म्हणजे शोरूमच्या छताची. लोखंडी पत्रे आणि जेमतेम अर्धा इंचाच्या प्लायवूडवरच इथल्या तकलादू शोरूमचे इमले थाटल्याचे सोमवारी "सकाळ'च्या पाहणीत उघड झाले. 

शोरूमचे मालक स्वतःसह कामगार आणि ग्राहकांच्याही जिवाशी खेळ करीत असल्याचे या पाहणीतून स्पष्ट झाले आहे. शोरूमच्या बांधकामाचा ढाचाच पोकळ असल्याने तो जीवघेणा ठरण्याची भीती जाणवली. आपले शोरूम आलिशान आहे, हे भासवीत इथल्या व्यावसायिकांनी पत्रे, प्लायवूडवर "प्लॅस्टर ऑफ पॅरिस'चा थर फासला आहे. पण, पहिल्या मजल्यावर सात-आठ लोक एकत्र येताच, शोरूमचा संपूर्ण मजलाच हेलकावे घेत असल्याचे जाणवते. पण, खरेदीत अडकलेल्या ग्राहकांपुढे शोरूमचा दिखाऊपणा उघड होत नाही. काही शोरूमच्या उभारणीची पाहणी केली असता "मोठं घर, पोकळ वासा' याची प्रचिती आली. 

उरुळी देवाची येथील राजयोग साडीच्या शोरूमला लागलेल्या आगीत पाच कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. त्यामुळे येथील बाजारपेठ, ग्राहक, कामगार आणि मालकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा चर्चेत आला आहे. या घटनेचे गांभीर्य ओळखत दोन्ही गावांतील कापड व्यावसायिकांनी गेल्या चार दिवसांत नेमक्‍या काय उपाययोजना केल्या, याची पाहणी पुन्हा केली. तेव्हा आगीपाठोपाठ छताचा पोकळपणाही ग्राहक, कामगारांच्या जिवावर बेतू शकतो, हे स्पष्ट झाले. 

"सप्तपदी' शोरूमचे मालक उल्हास शेवाळे म्हणाले, ""आम्ही पहिल्यांदा ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी उपाय केले आहेत. येथे सुरक्षारक्षक असून, पहिला मजलाही सुरक्षित आहे.'' 
या दोन्ही गावांतील लोकसंख्या, बाजारपेठा आणि लोकांची वर्दळ लक्षात घेऊन महापालिकेने स्वतंत्र अग्निशमन केंद्र सुरू करण्याची मागणी ग्रामस्थ अमोल हरपळे यांनी केली. 

यंत्रणा लक्ष देणार 
दोन्ही गावांतली बहुतांश शोरूम असुरक्षित आहेत. आग किंवा अन्य घटना घडल्यानंतर ग्राहक आणि कामगारांना दुकानातून बाहेर पडता येईल अशी व्यवस्था केलेली नाही. विशेष म्हणजे, या घटनेनंतरही बहुतांश दुकानांमध्येच कामगारांच्या राहण्याची सोय कायम आहे. कामगार हे रात्री दुकानात झोपत असल्याची कबुली मालकांनी दिली. त्यामुळे महापालिकेसह अन्य जबाबदार यंत्रणा याकडे लक्ष देणार का, असा प्रश्‍न ग्रामस्थ विचारत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT