पुणे

‘रोबोटिक्स’साठी पुढील पाच वर्षे निर्णायक

CD

नवी दिल्ली, ता. २७ (पीटीआय) : जगभरातील स्वायत्त प्रणालींचे (ऑटोनॉमस सिस्टीम्स) भवितव्य २०३१ पर्यंत कसे असेल, हे ठरवण्यासाठी पुढील पाच वर्षे अत्यंत निर्णायक ठरणार असल्याचा निष्कर्ष जागतिक आर्थिक मंचाने (डब्लूईएफ) आपल्या ताज्या अहवालात काढला आहे. रोबोटिक्सचे भवितव्य प्रामुख्याने तांत्रिक नवकल्पना आणि समाजाकडून त्याचा झालेला स्वीकार या दोन प्रमुख घटकांवर अवलंबून असेल, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
स्वायत्त तंत्रज्ञानासंदर्भात या अहवालात चार संभाव्य स्थिती मांडण्यात आल्या आहेत. यामध्ये ‘सिद्ध झालेली उपयुक्तता’ आणि ‘तंत्रज्ञानाकडून भ्रमनिरास’ या दोन शक्यता अधिक प्रबळ मानल्या जात आहेत. तंत्रज्ञानाची उपयुक्तता प्रत्यक्ष अनुभवाला येत असलेल्या लॉजिस्टिक, बंदरे आणि खाणकाम यांसारख्या नियंत्रित क्षेत्रांत रोबोटिक्सची प्रगती स्थिर राहील. तंत्रज्ञानाकडे एक विश्वासार्ह पायाभूत सुविधा म्हणून पाहिले गेल्याने सार्वजनिक विश्वासही टिकून राहील, असे अहवालात म्हटले आहे. याउलट, तंत्रज्ञानाबाबतच्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत, तर ‘भ्रमनिरास'' होऊ शकतो. यामुळे गुंतवणूक कमी होऊन या तंत्रज्ञानाचा वापर केवळ मर्यादित औद्योगिक क्षेत्रापुरता संकुचित होईल, असा इशाराही देण्यात आला आहे. अहवालात ‘एकात्मिक प्रगती’ हा तिसरा मार्ग सुचवण्यात आला आहे. ही एक आदर्श स्थिती असली तरी तो दूरचा टप्पा म्हणून पाहिले जात आहे. यामध्ये तांत्रिक प्रगती आणि सामाजिक सज्जता यांचा मेळ बसून आरोग्य सेवा आणि बांधकाम क्षेत्रात रोबोटिक्सचा मानवी मदतीसाठी प्रभावी वापर होऊ शकेल.

असमतोलाचा धोका
अहवालात ‘असमान वापर’ होण्याचा इशाराही देण्यात आला आहे. प्रगत रोबोटिक्स विकसित होईल, मात्र त्याचे नियंत्रण काही मोजक्या जागतिक सत्ता आणि बड्या खासगी कंपन्यांकडेच राहील. यामुळे डेटा आणि पुरवठा साखळीवर त्यांची मक्तेदारी निर्माण होऊन आर्थिक विषमता वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. पुढील पाच वर्षांत सुरक्षितता आणि पारदर्शकतेला प्राधान्य देणारी धोरणे आखणे आवश्यक आहे. स्वायत्त प्रणालींचा वापर कामाच्या ठिकाणी सुरक्षितता आणि आर्थिक फायद्यासाठी व्हावा, यासाठी आतापासूनच समन्वित प्रयत्न आणि नियमन प्रणाली मजबूत करणे गरजेचे असल्याचे ‘डब्लूईएफ’ने स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs RR Live: दे दणादण! वैभव सूर्यवंशीने पंजाबच्या गोलंदाजांचा केला पालापाचोळा; ८ चेंडूंत ४२ धावा, IPL 2026 मध्ये रचला इतिहास

विधान परिषदेसाठी भाजपकडून ६ उमेदवारांची घोषणा, कुणाला मिळाली संधी? वाचा यादी...

Harihar Panchamasali Math Controversy : पंचमसाली मठात हायव्होल्टेज ड्रामा! वचनानंद स्वामी आणि ट्रस्टींमध्ये जुंपली; कोट्यवधींच्या हिशेबावरून तीव्र वाद

बाबो... सहा चेंडूंत सहा विकेट्स! इंग्लिश गोलंदाजाचा भीमपराक्रम, १६ धावांत घेतले ७ बळी, संघाला मिळवून दिला ११६ धावांनी विजय

PBKS vs RR Live: स्टॉयनिसने लाज वाचवली! पंजाबला दोनशेपार पोहोचवले; राजस्थानच्या गोलंदाजांनी केला होता करेक्ट कार्यक्रम

SCROLL FOR NEXT