The future of water jar manufacturers is on stake due to Pmc orders to quality check of water 
पुणे

जारमधील पाण्याच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह; उत्पादकांचे भविष्य टांगणीला

सकाळवृत्तसेवा

पुणे : कार्यालय आणि घरोघरी पुरवण्यात येत असलेल्या जारमधील पाण्याच्या
गुणवत्तेबाबत प्रश्न निर्माण झाल्याने याबाबत कृती आराखडा तयार करण्यासाठी राज्य शासनाकडून राज्यातील जार व्यवसायिकांची माहिती जमा करण्यात येणार आहे. जारचे पाणी शरीरास अपायकारक ठरून, या उद्योगाद्वारे पर्यावरणाची हानी होत असेल तर त्याचे उत्पादन करणाऱ्यांचे भविष्य यामुळे सध्या टांगणीला लागले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

थंड पाण्याच्या जारची निर्मिती-विक्री करणाऱ्या क्षेत्रातील उद्योगांची (चिल्ड वॉटर जार युनिट्स) माहिती संकलित करण्याचे आदेश नगरपरिषद प्रशासन संचालनालयाने राज्यातील नगरपरिषद, नगरपंचायती, मुख्याधिकारी आणि महानगरपालिकांना दिले आहेत. संचालनालयाचे उपसंचालक भालचंद्र बेहेरे यांनी याबाबत आदेश काढला आहे. त्यानुसार पुढील दोन महिन्यात राज्यातील सर्व व्यवसायिकांची माहिती संकलित करून त्याबाबत कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे. व्यावसायिक विजयसिंह डुबल, संतोष सिन्हा आणि दत्तात्रय भरणे यांनी यासंदर्भात राष्ट्रीय हरित प्राधिकरणात (एनजीटी) महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी), राज्य सरकार, आर. ओ. चिल्ड वॉटर मॅन्युफॅक्चरर वेल्फेअर असोसिएशन नागपुर यांच्यासह तेरा जणांविरोधात येथील एनजीटीत ऍड.असीम सरोदे यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे. हे व्यवसायिक पुरवत असलेले पाणी आरोग्यास अपायकारक असून त्यातून पर्यावरणाची देखील हानी होत आहे. त्यामुळे अशाप्रकारे पाणी निर्मिती करणारे उद्योग बंद करावेत, अशी मागणी त्यात करण्यात आली होती.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
एमपीसीबीने याबाबत अहवाल तयार करावा, त्यावर कार्यवाही करून त्याबाबतचा रिपोर्ट सादर करावा, असे आदेश एनजीटीने या दाव्याच्या सुनावणीदरम्यान 19 जून रोजी दिले होते. त्यानुसार आता कृती आराखड्याची कार्यवाही करण्यात येत आहे.


''पाण्याचा अनिनियंत्रीत वापर, उपसा, प्रक्रिया आणि विक्री याबाबत ठोस धोरण नसल्याबाबतचे हे प्रातिनिधिक प्रकरण आहे. अति थंड करून विकण्यात येणाऱ्या पाण्याचा दर्जा व गुणवत्तेबाबत कोणतीच यंत्रणा जबाबदारी घेणार नसेल तर चिल्ड जारमधील पाण्यामुळे सामान्य लोकांचे आरोग्य धोक्यात टाकले जात आहे. राज्यातील पाण्याचे असे गैरव्यवहार त्वरित बंद झाले पाहिजेत.''
- ऍड. असीम सरोदे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT