Foreigner sakal
पुणे

G20 Conference : परदेशी पाहुण्यांच्या हाती टाळ अन् लेझीम

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचे विविधांगी दर्शन घडविणाऱ्या ‘सागा ऑफ मराठा एम्पायर’ कार्यक्रमाने ‘जी-२०’ बैठकीच्या निमित्ताने पुण्यात आलेल्या विविध देशांच्या प्रतिनिधींचे मन जिंकले.

सकाळ वृत्तसेवा

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचे विविधांगी दर्शन घडविणाऱ्या ‘सागा ऑफ मराठा एम्पायर’ कार्यक्रमाने ‘जी-२०’ बैठकीच्या निमित्ताने पुण्यात आलेल्या विविध देशांच्या प्रतिनिधींचे मन जिंकले.

पुणे - महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचे विविधांगी दर्शन घडविणाऱ्या ‘सागा ऑफ मराठा एम्पायर’ कार्यक्रमाने ‘जी-२०’ बैठकीच्या निमित्ताने पुण्यात आलेल्या विविध देशांच्या प्रतिनिधींचे मन जिंकले. शिववंदना, मर्दानी खेळ अन् शिवराज्याभिषेक गीताने कार्यक्रमात परमोच्च बिंदू गाठला.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘जी २०’ परिषदेनिमित्त विविध देशातून आलेल्या प्रतिनिधींसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सांस्कृतिक कार्यक्रमांच्या सादरीकरणाच्या अंतिम टप्प्यावर ढोल-लेझीमच्या तालावर परदेशी पाहुण्यांनी ढोल, लेझीम, टाळहाती घेत महाराष्ट्राच्या संस्कृतीला दाद दिली.

या वेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या आर्थिक घडामोडी या विभागाचे संयुक्त सचिव सॉलोमन अरोकिराज, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, कुलगुरू डॉ. कारभारी काळे, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पोलिस आयुक्त रितेश कुमार आदी मान्यवर उपस्थित होते.

भैरी भवानी परफॉर्मिंग आर्ट्सच्या कलाकारांनी ‘सागा ऑफ मराठा एम्पायर’ या संकल्पनेवर आधारित महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचे दर्शन कलेद्वारे घडविले. त्यानंतर अखेरीस ढोल, लेझीम ताशाचे सादरीकरण झाले आणि परदेशी पाहुणेही यात सामील झाले.

जी-२० बैठकीसाठी आलेल्या प्रतिनिधींचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी स्वागत केले. पालकमंत्र्यांनी काही प्रतिनिधींशी संवाद साधला. पुणे शहराने पाहुण्यांच्या स्वागतासाठी चांगली तयारी केली आहे. पाहुण्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाच्यावेळी व्यक्त केलेला आनंद लक्षात घेता पुणेकरांचे प्रयत्न सफल झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

नेदरलँडच्या सदस्यांना पुण्यातील रस्त्यांची भुरळ

‘पुण्यातील रस्ते हे रुंद तर आहेच, शिवाय ते अधिक सुंदर व आकर्षक आहेत. रस्त्यावरील दुभाजक, झाडे हे नेदरलँडच्या तुलनेने अधिक चांगले आहेत,’ असे सांगत नेदरलँडच्या प्रतिनिधींनी शहरातील रस्त्यांचे सोमवारी (ता. १६) कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidarbha Orange Alert : विदर्भाला ‘ऑरेंज अलर्ट’; राज्यात तीन दिवस पावसाची शक्यता पुणे घाटमाथ्याला ‘यलो अलर्ट’

IND vs NZ T20I Squad: भारत-न्यूझीलंड ट्वेंटी-२० मालिकेसाठी संघ जाहीर; अष्टपैलू खेळाडूची माघार, १५ जणांची तगडी टीम

PITRU PAKSHA 2026 VASTU TIPS: घरात सुख-शांती आणि सकारात्मकता राहिल टिकून! पितृपक्षापूर्वी फक्त 'या' ४ वस्तू बाहेर काढा

Marathi News Live Updates : माथेरान टॉय ट्रेनच्या मार्गावर दरड कोसळली

Ajit Pawar Jay Pawar : अजित पवारांचा 'अजित सृष्टी' देखावा पाहून जय पवारांना रडू आवरलं नाही; ‘आई अजून रडत असते का'?

SCROLL FOR NEXT