G-20 conference sakal
पुणे

G-20 Conference : देशाची प्रतिमा उंचावण्यास सर्वोच्च प्राधान्य द्यावे - लेफ्टनंट कर्नल उदयसिंग बारंगुले

पुण्यात जानेवारी २०२३ मध्ये होणाऱ्या जी-२० राष्ट्रांच्या परिषदेच्या आयोजनप्रसंगी देशाची प्रतिमा उंचावण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात यावे.

प्रशांत पाटील, सकाळ वृत्तसेवा

पुण्यात जानेवारी २०२३ मध्ये होणाऱ्या जी-२० राष्ट्रांच्या परिषदेच्या आयोजनप्रसंगी देशाची प्रतिमा उंचावण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात यावे.

पुणे - पुण्यात जानेवारी २०२३ मध्ये होणाऱ्या जी-२० राष्ट्रांच्या परिषदेच्या आयोजनप्रसंगी देशाची प्रतिमा उंचावण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात यावे. तसेच, परिषदेसाठी येणाऱ्या शिष्टमंडळाच्या भेटीप्रसंगी सुरक्षिततेला आणि शहराचे सौदर्यीकरण आणि स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे, असे निर्देश येथे आयोजित जी-२० परिषदेचे भारत सरकारचे विशेष कार्य अधिकारी लेफ्टनंट कर्नल उदयसिंग बारंगुले यांनी दिले.

जी-२० राष्ट्रसमुहाच्या परिषदेचे आयोजन भारतात होत असून, महाराष्ट्रात मुंबईसह पुणे आणि औरंगाबाद येथे या परिषदेतील सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे येथे होणाऱ्या जी-२० राष्ट्रांच्या परिषदेबाबत बारंगुले यांनी विधान भवन येथे बैठकीत पूर्वतयारीचा आढावा घेतला. विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी या वेळी उपस्थित होते.

परिषदेच्या नियोजनामध्ये कोणत्याही त्रुटी राहू नयेत. पुणे येथे जी-२० परिषदेच्या चार बैठकांचे आयोजन करण्यात आले असून, येत्या १६ ते १७ जानेवारी दरम्यान इन्फ्रास्ट्रक्चर वर्किंग ग्रुप बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वय ठेवून कार्य करावे. महाराष्ट्रासह पुण्याचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, ऐतिहासिक स्थळे, येथील खाद्यसंस्कृती, स्वच्छ पुणे याबाबतचे वैविध्य जगासमोर आणण्याची संधी मिळाली आहे. त्यादृष्टीने नियोजन करण्यात यावे, अशी सूचना बारंगुले यांनी केली. विविध देशांतून येणाऱ्या प्रतिनिधींच्या १२ ते १४ जूनदरम्यान डिजिटल इकॉनॉमी वर्किंग ग्रुपची बैठक होणार आहे. २६ व २७ जून रोजी एज्युकेशन वर्किंग ग्रुपची बैठक आणि २८ जून रोजी एज्युकेशन वर्किंग ग्रुप मिनिस्टेरियल बैठकीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

विभागीय आयुक्त राव म्हणाले, आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा प्रशासनाला अनुभव आहे. जी-२० परिषदेदरम्यान आयोजित सत्रांच्या आयोजनासाठी आवश्यक तयारी सुरु आहे. परदेशातून येणाऱ्या पाहुण्यांना विमानतळ ते मुक्कामाच्या ठिकाणापर्यंत पुण्याची वैशिष्ट्ये ठळक दिसतील, अशा पद्धतीने नियोजन करण्यात आले आहे. ऐतिहासिक व महत्त्वाची वारसा ठिकाणे, शैक्षणिक ठिकाणे, उद्योग आदी ठिकाणी परिषदेतील प्रतिनिधींच्या भेटींचे नियोजन करण्यात येत आहे. बैठकीस महसूल, पर्यटन, आरोग्य, सांस्कृतिक कार्य विभाग, पोलिस आणि परिवहनसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जस्टिस यशवंत वर्मा प्रकरणात 'एफआयआर'ची मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली; कोर्टाने नेमकं काय म्हटलं?

Asian Games 2026: १३ वर्षांच्या शाळकरी मुलीनं जिंकलं 'Gold'; भल्याभल्यांना जे नाही जमलं, ते करून दाखवलं

साठी गाठूनही सलमान खान फिट कसा? घरचं जेवण, वर्कआउट अन्... जाणून घ्या भाईजानचा फिटनेस फंडा

‘अपशब्द वापरण्यापेक्षा…’ शशांक केतकर ट्रोलर्सवर भडकला? उत्तर देत म्हणाला...आधी मी काय म्हणतोय ते...'

Marathi News Live Updates: पुण्यात गहाळ झालेली रोकड पोलिसांनी दोन दिवसांत शोधली

SCROLL FOR NEXT