G 20
G 20 Sakal
पुणे

PUNE : परदेशी पाहुण्यांचा ‘हेरिटेज वॉक’

सकाळ डिजिटल टीम

जी-२० बैठकीसाठी पुण्यात आलेल्या विविध देशांतील प्रतिनिधींनी आज येथील वारसास्थळांना भेट दिली. परदेशी पाहुण्यांसाठी ‘हेरिटेज वॉक’ अंतर्गत शनिवार वाडा, लाल महाल आणि नाना वाड्याला भेट आयोजित करण्यात आली होती.

शनिवारवाड्याची भव्यता पाहून पाहुणे अचंबित झाले. तर लाल महालमध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा इतिहास जाणून घेतला.

मंगळवारी सकाळी शनिवारवाड्यापासून हेरिटेज वॉकला सुरवात झाली. पारंपरिक ढोल ताशाच्या गजरात पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.

शनिवारवाड्याची भव्यता, प्रवेशद्वार, विस्तारलेला परिसर प्रतिनिधींनी आपल्या मोबाईलमध्ये टिपला. येथील इतिहासाविषयी उत्सुकतेने त्यांनी मार्गदर्शकांना प्रश्नही विचारले.

G 20

लाल महल येथे पारंपरिकपद्धतीन सनर्इ चौघड्याच्या वादन करून पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. राजमाता जिजाऊ आणि बाल शिवाजी महाराजांचा पुतळा पाहिल्यानंतर त्यामागचा इतिहासही त्यांनी जाणून घेतला.

महालातील छायाचित्रेही त्यांनी आपल्या मोबाईमध्ये टिपली. भेटीच्या अखेरच्या टप्प्यात प्रतिनिधींनी नाना वाडा येथे भेट देऊन तेथील इतिहास जाणून घेतला.

अजित आपटे, संदीप गोडबोले, सुप्रिया शेलार यांनी पाहुण्यांना पुण्याचा इतिहास आणि वारसा स्थळांबाबत माहिती दिली. यावेळी महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, पोलिस उपायुक्त संदीपसिंह गिल, महानगरपालिकेचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे उपस्थित होते. शनिवार वाडा येथे पिंगळा, वासुदेव, पारंपरिक गोंधळी कलाकारांनी कलेचे सादरीकरण केले.

गोंधळी बांधवांनी संकेतभाषा कला असलेली करपल्लवीचे सादरीकरण करत बोटांच्या संकेतातून पाहुण्यांची नावे ओळखल्याने पाहुण्यांनी आश्चर्य व्यक्त केले. संबळ, हलगीचे सादरीकरण करण्यात आले.

पारंपरिक कुंभार कलेअंतर्गत चाकावर मातीची भांडी करण्याची कला प्रदर्शित करण्यात आली. शनिवारवाडा आवारात लावण्यात आलेल्या आर्टिफिशियल ज्वेलरी, कलाकुसरीच्या वस्तूंच्या स्टॉलमधील बांगड्या, कानातील आभूषणांनी महिला प्रतिनिधींना आकर्षित केले.

रस्ते बंद झाले म्हणून गैरसोय :

परदेशी पाहुण्यांच्या ‘हेरिटेज वॉक’ साठी शनिवारवाडा, लाल महाल आणि नाना वाड्यात कोणताही अडथळा न येता पोचता यावे यासाठी शिवाजी रस्ता शनिवारवाड्यापासून दगडूशेठपर्यंत वाहतुकीसाठी काही काळ बंद करण्यात आला होता.

त्यामुळे त्यामुळे परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. रस्ता देखील ओलांडता येत नसल्याने पादचाऱ्यांना गैरसोर्इचा सामना करावा लागला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray:"मी काही ज्योतिषी आहे का?"; मतदानानंतर राज ठाकरेंचं पत्रकारांना उत्तर

MS Dhoni Retirement : "एमएस धोनीने मॅनेजमेंटला सांगितले..." थालाच्या निवृत्तीवर CSK अधिकाऱ्याचा मोठा खुलासा

Gullak 4: प्रतीक्षा संपली! गुल्लक-4 येणार प्रेक्षकांच्या भेटाला, कधी रिलीज होणार वेब सीरिज? जाणून घ्या

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: धर्मेंद्र, गुलजार यांच्यासह बॉलिवूडच्या दिग्गजांनी बजावला मतदानाचा अधिकार

केजरीवालांच्या ड्रॉईंग रुममध्ये नाही, पण बेडरुममध्ये आहे सीसीटीव्ही; 'आप'ने सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT