g20 summit pune Foreign visitors enjoyed the dhol tasha and other Cultural programmes  
पुणे

G20 Summit Pune : परदेशी पाहुण्यांना ढोल-ताशाची भुरळ! पाहा PHOTOS

सकाळ डिजिटल टीम

पुणे : जी 20 परिषदेला आजपासून सुरुवात होत आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी या परिषदेचे उद्घाटन केले . आजपासून इन्फ्रास्ट्रक्चर वर्किंग ग्रुप (IWG) ची दोन दिवसीय बैठक सुरु होणार आहे. या बैठकीत सहभागी होणारे देश आणि संस्था पायाभूत सुविधांमधील गुंतवणुकीच्या विविध पैलूंवर विचारमंथन करतील.

G20 परिषदेच्या निमित्ताने 35 देशातील राजदूत हे सध्या पुण्यात आहेत. आज आणि उद्या पुण्यात दोन दिवस ही G20 परिषद आहे.
याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आज पुणे विद्यापीठात एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
पुणे विद्यापीठातील याच कार्यक्रमात पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी ढोल ताशा आणि लेझीम पथक लावण्यात आलं होतं.
या कार्यक्रमात परदेशी पाहुण्यांना देखील आपल्या भारतीय ढोल ताशाची आणि लेझीमची भुरळ पडलेली पाहायला मिळाली..
हे पाहुणे ढोल पथकासोबत ढोल ताशा वाजवताना आणि लेझीम खेळताना पहायला मिळाले.
यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमांच्या सादरीकरणाच्या अंतिम टप्प्यावर ढोल-लेझीमच्या तालावर परदेशी पाहुण्यांनी ठेका धरला.
ढोल, लेझीम, टाळ हाती घेत महाराष्ट्राच्या संस्कृतीला दाद दिली.
शिव वंदना, शिवराज्याभिषेक गीत देखील यावेळी सादर करण्यात आले.
यावेळी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या आर्थिक घडामोडी या विभागाचे संयुक्त सचिव सॉलोमन अरोकिराज, विभागीय आयुक्त सौरभ राव, कुलगुरू डॉ. कारभारी काळे, पुणे महानरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पोलीस आयुक्त रितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virat Kohli Century : विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड! KKR विरुद्ध शतकी खेळी अन् आशियात कोणालाच न जमलेला केला पराक्रम...

IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्सला खूप मोठा धक्का! मॅच विनर खेळाडूला दुखापत, उपचारासाठी लंडनला जाणार; स्पर्धेतून माघार निश्चित

IPL 2026 Playoff Scenario: विराट कोहलीचा झंझावात अन् RCB गुणतालिकेत अव्वल! KKR चे आव्हान संपले का? जाणून घ्या समीकरण

RCB VS KKR LIVE: विराट कोहलीची पहिली धाव अन् सेलिब्रेशन जणू Century सारखं, चाहत्यांना हसू आवरेना... Viral Video ची मजेशीर गोष्ट

Milk Rate Hike: महागाईचा आणखी एक फटका! अमूलनंतर मदर डेअरीनेही दूध दर वाढवले, किती रुपयांनी? बजेट कोलमडणार

SCROLL FOR NEXT