पुणे

ऊस देयकासाठी गंगाखेड येथे एल्गार मोर्चा

CD

जी-७ कारखान्याने
३०० रुपये दुसरा हप्ता द्यावा

राष्ट्रीय समाज पक्ष, स्वाभिमानी संघटनेतर्फे एल्गार मोर्चा

ॲग्रोवन वृत्तसेवा
परभणी : जी-७ साखर कारखान्याने मागील हंगामात तुटलेल्या उसाला प्रति टन ३०० रुपये दुसरा हप्ता जाहीर करावा, या मागणीसाठी सोमवारी (ता. २) गंगाखेड येथे राष्ट्रीय समाज पक्ष आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे एल्गार मोर्चा काढण्यात आला.
दुष्काळी स्थिती तसेच साखरेचे वाढलेले दर या पार्श्वभूमीवर मागील हंगामात तुटलेल्या उसाला प्रति टन ३०० रुपये दुसरा हप्ता देणे बंधनकारक आहे. येत्या आठ दिवसांत जी-७ साखर कारखान्याने मागील हंगामात तुटलेल्या उसासाठी दुसरा हप्ता किती देणार, हे जाहीर करावे, अशी मागणी या वेळी करण्यात आली.
या मागणीसाठी काढण्यात आलेल्या एल्गार मोर्चात राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मराठवाडा प्रमुख किशोर ढगे, पवन करवर, मुंजा लोडे, रामप्रसाद गमे यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते.

फोटो
परभणी : ऊस देयकाच्या प्रश्नी गंगाखेड येथे काढण्यात आलेल्या एल्गार मोर्चात राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष किशोर ढगे यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News: भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या, जागेवरच मृत्यू; शिंदेसेनेच्या नेत्यानं कट रचल्याचा आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ

Satana Bribery Case: वडिलांच्या मालमत्तेवर वारस नोंद करण्यासाठीही लाच! सटाण्यातील सरकारी अधिकारी एसीबीच्या ताब्यात, नेमकं काय घडलं..

Pune Metro: बाणेर-बालेवाडीतील मेट्रो स्थानकांना डावलल्याने नागरिक रस्त्यावर; मेट्रो सुरू करण्यास विरोध, आंदोलनकर्ते ताब्यात

IND vs NZ : विराट कोहली न्यूझीलंडमध्ये सचिन तेंडुलकरचा आणखी एक विक्रम मोडणार? सेहवागलाही मागे टाकण्याची संधी

Koyna Dam Water Release : कोयनेच्या विसर्गाने वाहू लागली 'कृष्णा'; शेतकऱ्यांना मोठा दिलासा, शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत

SCROLL FOR NEXT