नुकसान जास्त; भरपाई कमी,
९० टक्के शेतीविना पीकविमा
ॲग्रोवन वृत्तसेवा
गडचिरोली : नैसर्गिक आपत्ती आणि कीड-रोगांमुळे पिकांचे नुकसान वाढत असताना जिल्ह्यात यंदा पीकविमा संरक्षण अत्यल्प राहिले आहे. मुदतवाढ देऊनही पीकविमा योजनेला शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामातील सुमारे ९० टक्के क्षेत्र पीकविम्याच्या संरक्षणाबाहेर राहिले आहे.
जिल्ह्यात यंदा सुमारे २ लाख १६ हजार हेक्टरवर खरीप पिकांची पेरणी नियोजित आहे. त्यापैकी केवळ सुमारे २६ हजार हेक्टर क्षेत्राचा पीकविमा उतरविण्यात आला आहे. म्हणजेच पेरणी क्षेत्राच्या तुलनेत विमा संरक्षण क्षेत्र अत्यल्प आहे. विशेषतः भात पिकाचे क्षेत्र मोठे असताना त्यालाही विमा संरक्षण मिळण्याचे प्रमाण कमी आहे. जून-जुलैमध्ये झालेला पाऊस आणि त्यानंतर निर्माण झालेल्या हवामानातील बदलामुळे खरीप पिकांवर विविध संकटे आली आहेत. अशा परिस्थितीत पिकांचे नुकसान झाल्यास विम्याच्या माध्यमातून भरपाई मिळण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा असते. मात्र यंदा विमा उतरविण्याचे प्रमाणच कमी असल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
--- चौकट ----
सुधारणांची गरज
पीकविमा भरण्यासाठी शासनाकडून १० ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली होती. विमा कंपन्यांच्या अटी, प्रत्यक्ष नुकसान आणि भरपाई मिळण्याबाबतचा अनुभव यामुळे शेतकऱ्यांमध्ये विम्याबाबत अनास्था निर्माण झाल्याचे चित्र आहे. भरपाई मिळण्यासाठी पंचनामे, निकष आणि इतर प्रक्रियांमुळे शेतकऱ्यांना अडचणी येतात. त्यामुळे विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून प्रक्रिया सुलभ करण्याची गरज व्यक्त होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.