पुणे

.

CD

‘गडकरींविरोधी
मजकूर हटवा’

मुंबई : इथेनॉलमिश्रित इंधनाच्या (ई-२०) वादावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची बदनामी करणारा समाजमाध्यमांवरील मजकूर अत्यंत घृणास्पद, आक्षेपार्ह आणि अश्लील असल्याचे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवले असून, हा मजकूर तत्काळ हटवण्याचे आदेश दिले आहेत. ‘मेटा’, ‘एक्स कॉर्प’ आणि ‘गुगल एलएलसी’ या कंपन्यांना न्यायालयाने कडक निर्देश देताना अशा मजकुराला ऑनलाइन माध्यमांत अजिबात स्थान देता कामा नये, असे कडक शब्दांत सुनावताना गडकरी यांना दिलासा दिला.
न्या. आरिफ डॉक्टर यांच्या एकलपीठासमोर बुधवारी (ता. ५) या प्रकरणाची सुनावणी झाली. समाजमाध्यम कंपन्यांच्या कार्यपद्धतीवर न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले. एखाद्या व्यक्तीविषयी केवळ विष ओकणारा असा मजकूर ‘ऑनलाइन’ व्यासपीठांवरून स्वतःहून हटवला गेला पाहिजे. या कंपन्यांकडे प्रगत तंत्रज्ञान उपलब्ध असताना आक्षेपार्ह मजकूर ओळखून तो तातडीने हटवणारी स्वयंचलित यंत्रणा त्यांच्याकडे का नाही, दाद मागण्यासाठी संबंधित व्यक्तीला न्यायालयाची पायरी चढण्याची वेळच का यावी, असे सवालही न्यायालयाने गडकरी यांना दिलासा देताना केले.
भविष्यात अशा प्रकारचा ‘डीपफेक’ किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून तयार केलेला खोटा मजकूर प्रसिद्ध झाल्यास गडकरी यांनी थेट संबंधित व्यासपीठाकडे दाद मागावी आणि त्या कंपन्यांनी त्यावर विनाविलंब कारवाई करावी, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. या प्रकरणात पुढील सुनावणी चार आठवड्यांनंतर ठेवली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Officer Mobile Video : खासदारांच्या काजू-बदामनंतर आता अधिकाऱ्यांचा असंवेदनशील चेहरा; कृषिमंत्र्यांच्या दुष्काळ आढावा बैठकीत मोबाईलमध्ये दंग

Kannad Teacher Credit Society: आमसभेत आर्थिक अनियमिततेचे आरोप; चर्चा सुरू असतानाच राष्ट्रगीताने सभा गुंडाळल्याचा दावा

Martyr Wife Success Story: १८ वर्षांपूर्वी पती गमावला; आज त्याच वर्दीत देशसेवेची जबाबदारी, वीरपत्‍नी कल्पना पवारांचा संघर्षमय अन् प्रेरणादायी प्रवास..

Marathi News Live Updates : भारत आणि जपानच्या हवाई दल प्रमुखांचे 'तेजस'मधून उड्डाण

India Pakistan Passports : अंबरनाथमध्ये एकाच व्यक्तीकडे भारत-पाकिस्तानचे पासपोर्ट; मुंबई ATS कडूनही चौकशी सुरू

SCROLL FOR NEXT