corona in bhigwan Sakal Media
पुणे

भिगवण येथील गायकवाड पिता-पुत्राचा कोरोनाने मृत्यू

गायकवाड कुटुंबातील काही सदस्यांना पंधरा दिवसांपुर्वी कोरोनाची लागण झाली होती.

प्रा. प्रशांत चवरे

भिगवण : येथील गायकवाड परिवारातील पिता पुत्राचे कोरोनामुळे निधन झाले आहे. व्यावसायिक असलेल्या गायकवाड कुटुंबातील पिता पुत्राच्या निधनाची बातमी समजताच अनेकांना धक्का बसला तर गावावर शोककळा पसरली.

दत्तात्रय विठ्ठल गायकवाड(वय. ८५) व बाळासाहेब दत्तात्रय गायकवाड (वय. ४९) अशी कोरोनामुळे मयत झालेल्या पिता पुत्राची नावे आहेत. येथील गायकवाड कुटुंबातील काही सदस्यांना पंधरा दिवसांपुर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यापैकी दत्तात्रय गायकवाड व बाळासाहेब गायकवाड यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांच्यावर बारामती येथील खासगी रुग्नालयांमध्ये उपचार सुरु होते. वडील दत्तात्रय गायकवाड यांची प्रकृती खालावुन त्यांचे निधन झाले व त्यांचा मुलगा बाळासाहेब गायकवाड यांची मृत्यूशी झुंज सुरु होती. अखेर मंगळवारी(ता.१८) सकाळी बाळासाहेब गायकवाड यांची मृत्यूशी सुरु असलेली झुंज अपयशी ठरली व त्यांची प्राणज्योत मालवली.

येथील गायकवाड कुटुंबियांचा पेठेमध्ये आडत दुकान, दुग्ध व वाहतुकीचा व्यवसाय आहे. चिकाटीने व्यवसाय करणारे कुटुंब म्हणुन गायकवाड कुटुंबिय सर्वपरिचित आहे. पिता पुत्राच्या निधनाची माहिती मिळताच सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. येथील व्यावसायिक राजेंद्र उर्फ पिंटू गायकवाड हे दत्तात्रय गायकवाड यांचे पुत्र तर बाळासाहेब गायकवाड यांचे बंधु होत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Metro: पुणे मेट्रोचा मोठा निर्णय! बंद असलेले गेट्स आता पूर्वीसारखे उघडणार नाहीत; मंगळवारी वेळेत बदल

Police Action: धूलिवंदनला कायद्याचा कडक पहारा! उल्हासनगर पोलिस सतर्क; समाजकंटकांवर राहणार करडी नजर

Latest Marathi News Live Update : दुबईमध्ये अडकलेल्या नागरिकांना मंत्री गिरीश महाजनांचा फोन, परिस्थितीची घेतली माहिती

जगावर घोंगावतंय महायुद्धाचं संकट! Baba Vanga यांनी दशकांपूर्वीच केली होती भीषण युद्धाची भविष्यवाणी; सध्याच्या घटनांशी जुळतंय का भाकीत?

IND vs ENG: २ पराभव अन्... ! भारताचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत इंग्लंडविरुद्ध रेकॉर्ड कसा आहे? जाणून घ्या आकडे कोणाच्या बाजूने

SCROLL FOR NEXT