पुणे

गदिमा म्हणजे महाराष्ट्राच्या मातीशी एकरुप झालेला कवी; डॉ. सदानंद मोरे

जितेंद्र मैड

कोथरुड : गदिमा म्हणजे महाराष्ट्राच्या मातीशी एकरुप झालेला कवी.मात्र गदिमांचे चरित्र अजून का लिहिले नाही याचे मला आश्चर्य वाटते.त्यांच्या जीवन कार्यावर लोकराज्यचा अंक प्रकाशित झाला.पण एक चांगलेचरित्र लिहायची गरज आहे असे मत महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृतीमंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आलेल्या गदिमा स्मृतीसमारोहात डॉ. मोरे यांच्या हस्ते गदिमा स्मृती पुरस्कार ज्येष्ठ अभिनेताआणि सामाजिक कार्यकर्ते नाना पाटेकर, गृहीणी सखी सचिव पुरस्कार अभिनेत्रीनिवेदीता जोशी सराफ, गायीका रश्मी मोघे,यांना विद्या प्रज्ञा पुरस्कार तरसंगीतकार कौशल इनामदार यांना चैत्रबन पुरस्कार प्रदान करण्यात आला.त्यावेळी डॉ. मोरे बोलत होते. यावेळी गदिमा प्रतिष्ठानचे कार्यकारीविश्वस्त आनंद माडगूळकर, वर्षाताई पारखे, राम कोल्हटकर, प्रकाश भोंडे आदीउपस्थित होते.

पुरस्कार विजेते नाना पाटेकर यांच्या बद्दल बोलताना डॉ. मोरे म्हणाले की,स्वबळावर उच्च स्तरावर जाणारांमध्ये नाना पाटेकर आहेत. सिनेमात पुढेजाण्यासाठी हिरोच पाहिजे असे नाही. नेहमीसारखा हीरो नसलेला पण संपूर्णचित्र पटसृष्टीत छा गया असा माणूस म्हणजे नाना पाटेकर आहेत. नाना,फडणीस नाना, इतर नाना करीती तनाना या एका कवीने केलेल्या कवीतेचा उल्लेखकरत डॉ. मोरे म्हणाले की, नाना फडणीसांच्या काळात नाना पाटेकर असते तर हीकविता लिहिण्याचे कोणाचे धाडस झाले नसते.नाना पाटेकर म्हणाले की, आश्रमात या कधीरे येशील हे गदीमांचे गाणे माझीआई गुणगुणायची. गदिमा लोकविलक्षण यासाठी वाटतात की त्यांनी सर्व रसांनास्पर्ष केला. लावणी, प्रेमगीत, विरहगीत असो की बालगीत. खुप साध्यासोप्या, सर्वांना समजेल अशा शब्दात त्यांची गीते असायची. मात्र मराठीअतिशय क्लीष्ठ लिहिणारांचा उदोउदो काही लोकांनी केला.प्रास्तविक आनंद माडगुळकर यांनी केले सुत्रसंचालन अरुण नुलकर यांनी केले.

गदिमांच्या, उध्दवा अजब तुझे सरकार या गाण्यातील काव्य पंक्ती आपल्या खास

शैलीत उच्चारत नाना पाटेकर म्हणाले की, कधी लिहिलय माहिती नाही. पण आज ही जुळतयं. कमाल आहे. त्यांच्या या वाक्याला हशा आणि टाळ्यांची दाद मिळाली.

शालांत परिक्षेत मराठी विषयात पैकीच्या पैकी गुण मिळविणा-याविद्यार्थ्यांना एकून २५०० रुपयाचे बक्षिस देण्यात येते. यावेळी १३विद्यार्थ्यांना हे बक्षिस जाहीर झाले. नाना पाटेकर यांनी या प्रत्येकविद्यार्थ्याला २५०० रुपये द्यावे असे सांगत आपल्या पुरस्काराचे एकवीसहजार रुपये त्यासाठी वापरावे. त्यामध्ये अधिकची रक्कम ही मी देतो. पुढीलवर्षापासून पुरस्काराची ही रक्कम दहा हजार रुपये करावी नाम फाऊंडेशन दरवर्षी ही रक्कम देईल असे पाटेकर यांनी सांगितले..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट! परिसर हादरला; घरांची मोठी पडझड, पाहा व्हिडीओ

Pune Station: पुण्यासह पाच रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला बेड्या

Virat Kohli : इम्पॅक्ट खेळाडूच्या नियमावर विराटचीही टीका;सामन्याचा समतोल बिघडत असल्याचे व्यक्त केले मत

VIDEO: आरसीबी प्लेऑफमध्ये जाताच विरुष्काचं भन्नाट सेलिब्रेशन; व्हिडीओनं वेधलं साऱ्यांचे लक्ष

शेतीवर कर्ज घेणारा शेतकरी झाला अब्जाधीश! खात्यात आले ९९ अब्ज रूपये, रक्कम पाहून बँकेसह खातेधारकाला बसला धक्का

SCROLL FOR NEXT