पुणे

स्क्रीन टाइम

CD

स्क्रीन टाइम
-----------
पँगोलिन- कुलूज् जर्नी
------------
‘खवल्या’ बाळाचा प्रवास!
---------
दोस्तांनो, खवल्या मांजर (पँगोलिन) हा एक आगळावेगळा सस्तन प्राणी आहे. भारतातील जंगलांत खवल्या मांजर आढळते; पण ते ‘औषधी आणि शुभ’ असल्याचा समज असल्यामुळे या प्राण्याला शिकाऱ्यांपासून खूप धोका असतो. जगात इतरही अनेक ठिकाणी खवल्या मांजराची स्थिती हीच आहे. अशाच एका खवल्या मांजराच्या बाळाची गोष्ट आहे- ‘पँगोलिन- कुलूज् जर्नी’ या माहितीपटात.
---------
माहितीपटात काय काय?

या माहितीपटाची सुरुवात या प्राण्याविषयीच्या मौलिक माहितीने होते. खवल्या मांजरांचा चीनमधील पारंपरिक औषधांत वापर करतात. त्यासाठी त्यांची खूप शिकार केली जाते. (त्यांचे खवले प्रामुख्याने औषधांत वापरले जातात.) त्यांची या प्रकारे शिकार होत राहिली तर २०-३० वर्षांनंतर पृथ्वीवर एकही खवल्या मांजर शिल्लक राहणार नाही अशी भीती संरक्षकांना आहे. वन्यप्राण्यांचे संरक्षक एकदा दक्षिण आफ्रिकेत ‘स्टिंग ऑपरेशन’ करून तस्कर लोकांनी विकायला आणलेले एक खवल्या मांजर पकडतात. या पिल्लाचे नाव ठेवले जाते ‘गजिमा’ (दुसरे नाव ‘कुलू’). तस्करांच्या तावडीत सापडल्यानंतर भेदरलेल्या आणि प्रकृती खालावलेल्या गजिमावर काही दिवस उपचार करून त्याला सोडून द्यायची योजना असते. जोहान्सबर्गजवळ ‘लेपलाला अभयारण्य’ आहे. तिथे खवल्या मांजरांचे खाद्य असलेल्या मुंग्यांच्या अनेक प्रजाती असल्यामुळे गजिमाला तिथे सुखरूप सोडायचा निर्णय घेतला जातो. संरक्षक गॅरेथ थॉमस यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात येते. पण हे मुळीच सोपे नाही हे त्यांच्या लगेच लक्षात येते! प्रवासादरम्यान गजिमाला खायला देणे हे एक मोठेच काम असते. समोर मुंग्या आणून ठेवल्या तरी खवल्या मांजर त्या खात नाही. निसर्गात मुंग्यांचे वारूळ शोधून गजिमाला तिथपर्यंत घेऊन जावे लागते व नंतर तो आपल्या लांब जिभेने मुंग्या व त्यांची अंडी खातो. दुसरे आव्हान म्हणजे खवल्या मांजराला इलेक्ट्रिक तारांच्या कुंपणापासून दूर ठेवणे. एकदा गॅरेथ व गजिमा दोघांना विजेचा झटका लागतो. ही सगळी आव्हाने स्वीकारून थॉमस गॅरेथ सहा महिने या खवल्या मांजर पिलाबरोबर राहतात. त्याला जंगलात एकटे राहायची सवय व्हावी यासाठी धडपडतात. गजिमा- म्हणजेच कुलूला मोकळे सोडेपर्यंतचा त्यांचा पूर्ण प्रवास या माहितीपटात आला आहे. हा माहितीपट ‘नेटफ्लिक्स’वर उपलब्ध आहे.
----------
माहितीपटाची वैशिष्ट्ये

खवल्या मांजराची बरीच नवी माहिती तुम्हाला या माहितीपटात मिळेल. आफ्रिकेच्या जंगलांत वा आसपास राहणाऱ्या प्रजाती निसर्गाशी कशा समरस होतात, कोणतेही शिक्षण वा प्रशिक्षण न घेताही त्यांच्यातील अनेक जण वन्यजीव संवर्धनाच्या कामात कसे योगदान देतात, ही माहिती प्रेरणादायी आहे. तुम्ही हा माहितीपट आई-बाबांसह पाहू शकता.

------------
कशासाठी बघायचा माहितीपट?

- वन्यप्राण्यांच्या जगात आपल्याला खूप काही शिकायला मिळते.
- गॅरेथ यांच्या मनात असलेली अस्वस्थता कमी होण्यासाठी वन्यजीव संरक्षणाच्या कामामुळे व विशेषत: खवल्या मांजराबरोबर राहिल्याने मदत झाली. ही निसर्गाची ताकद आहे!
---------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी, मेलबर्न पोलिसांकडून तपास

IND vs ENG, 2nd T20I: अभिषेक-ईशानची फिफ्टी हुकली, पण तिलक वर्माची दमदार फिनिशिंग, भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध १९० धावा पार

Pune Rain Alert: पुण्यात सलग पावसाची रिपरिप; घाट परिसरासाठी पुढील दोन दिवस ‘रेड’ अलर्ट, प्रशासनाचे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

Mumbai News: श्वानांचा ९३ नागरिकांना चावा, विधानसभेत मुद्दा गाजला; भटक्या कुत्र्यांसाठी महायुती सरकारचा मोठा निर्णय

Sports Teacher Recruitment : क्रीडा शिक्षक भरती रखडल्याने विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात; आझाद मैदानात ८ जुलैपासून बेमुदत धरणे आंदोलन

SCROLL FOR NEXT