पुणे

विधायक......खंडोबाचीवाडीत घुमतोय गजी - ढोलचा नाद ५० पेक्षा जास्त मुले - मुली घेताहेत वादनाचे व खेळण्याचे प्रशिक्षण

CD

ANR26B02910
खंडोबाचीवाडी (ता. मोहोळ) ः येथील खंडोबा मंदिरात गजी ढोलचे गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेणारी मुले व -मुली.

तरुणांच्या सरावातून गजीढोल खेळाला नवी उभारी
खंडोबाचीवाडीत खंडोबा यात्रेनिमित्त गजीढोलाचे खेळ; ग्रामस्थांकडून होतेय कौतुक

अनगर, ता. ७ ः खंडोबाचीवाडी येथील ग्रामदैवत खंडोबा यात्रेला एक महिना राहिला असून, यात्रेत गजीढोल वादनाची व खेळण्याची प्रथा आहे. वाढत्या बदलत्या करमणुकीच्या जमान्यात हा खेळ हरवत चालला असताना खंडोबाचीवाडीत मात्र गावातील तरुण तसेच लहान मुले-मुली मंदिरासमोर सायंकाळी एकत्र जमून पारंपरिक गजीढोल खेळाचा सराव करत आहेत. यातून या खेळाला नवी उभारी मिळत आहे.

या सर्वांना खेळाचे प्रशिक्षण ज्येष्ठ नागरिक आगतराव गुंड व अनंता शितोळे देत आहेत. तर ढोल वाजविण्याचे प्रशिक्षण मंदिराचे पुजारी सतीश माळी, दीपक गुंड, रोहित मुसळे, किशोर गुंड, विजय गुंड आदी देत आहेत. पारंपरिक खेळाची जोपासना करून त्याला उर्जितावस्था देत असल्याबद्दल सहकार परिषदेचे अध्यक्ष राजन पाटील, विक्रांत पाटील, अजिंक्यराणा पाटील, अनगरच्या नगराध्यक्षा प्राजक्ता पाटी यांनी कौतुक केले आहे.

कोट
- पारंपरिक गजीढोल हा ग्रामदैवत खंडोबा यात्रेत खेळला जाणारा महत्त्वाचा खेळ आहे. पुढच्या पिढीने यात तरबेज व्हावे, या उद्देशाने गावातील मुलांना खेळाचे व वादनाचे प्रशिक्षण सुरू केले आहे
- आगतराव गुंड, ज्येष्ठ नागरिक, खंडोबाचीवाडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sion Bridge: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! सायन पूल वाहतुकीसाठी खुला होणार; प्रशासनाकडून तारीख आली समोर

Pune News: पुण्यातील उड्डाणपूल कार्यक्रमात प्रशासनाची घोडचूक! चूक दुरुस्त करण्यासाठी उभारलेल्या पुलाचे नावच चुकवलं; प्रकरण काय?

Iran-Israel War: इराणचा मोठा निर्णय! होर्मुज समुद्रधुनी केली खुली, जगभरातलं इंधन संकट टळलं; आता हल्ले करणार नसल्याचं स्पष्टीकरण

Pune Crime: खेळ मांडला! एका महिन्यात विवाहितेचे लावले तीन लग्न; पुण्यातल्या रॅकेटचा पर्दाफाश

Treatment deadline: रुग्णालयात ३० मिनिटांत उपचार सुरू करणे बंधनकारक; नवीन आपत्कालीन नियमावली लागू, प्रशासनाचा कडक इशारा

SCROLL FOR NEXT