गॅलेक्सी मल्टिस्टेट मल्टिपर्पजच्या फलटण शाखेचे उद्घाटन
आसू, ता. २३ : गॅलेक्सी मल्टिस्टेट मल्टिपर्पज संस्थेच्या महाराष्ट्रातील पहिल्या शाखेचे उद्घाटन केले असून, कर्नाटक राज्यात गॅलेक्सी मल्टिस्टेटच्या शाखा सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व के. बी. उद्योग समूहाचे संचालक सचिन यादव यांनी केली.
केंद्र शासनाकडून संस्थेला मल्टिस्टेट मल्टिपर्पज संस्था म्हणून अधिकृत मान्यता मिळाल्यानंतर पहिल्या फलटण शाखेचा प्रारंभ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व के. बी. उद्योग समूहाचे संचालक सचिन यादव व सुजाता यादव यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी संस्थेतील अधिकारी व कर्मचारी वर्ग, के. बी. ग्रुप ऑफ कंपनीजचे अधिकारी- कर्मचारी, तसेच सभासद उपस्थित होते.
गॅलेक्सी को-ऑप. क्रेडिट सोसायटीची स्थापना २४ डिसेंबरला झाली असून, सुरुवातीला तालुका कार्यक्षेत्र असलेली ही संस्था आज सातारा व पुणे जिल्ह्यात विस्तारून ७ शाखांद्वारे यशस्वीपणे कार्यरत आहे. सचिन यादव यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली संस्थेने अल्पावधीतच उल्लेखनीय प्रगती साधली आहे. संस्थेने १२० कोटी रुपयांचा एकत्रित व्यवसाय पूर्ण केला असून, १० हजार सभासदांचा टप्पा यशस्वीपणे पार केला आहे. सलग ४ वर्षांपासून संस्थेला ‘अ’ वर्ग ऑडिट मानांकन प्राप्त झाले असून, पारदर्शक कारभारामुळे सभासदांचा विश्वास अधिक दृढ झाला असल्याचे त्यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले.
संस्थेमार्फत विविध आकर्षक बचत योजना राबवून सर्वसामान्य नागरिकांना सहकार प्रवाहात सहभागी करून घेतले जात आहे. अडचणीच्या काळात आर्थिक साहाय्य देत सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य संस्था सातत्याने करत असल्याचे आवर्जून सांगताना लवकरच कर्नाटक राज्यात गॅलेक्सी मल्टिस्टेट मल्टिपर्पजच्या शाखा सुरू करून के. बी. एक्स्पोर्टच्या माध्यमातून सुरू असलेल्या करार शेतीचा लाभ कर्नाटकमधील शेतकऱ्यांना अधिक प्रभावीपणे मिळावा, या उद्देशाने या आर्थिक वर्षात तेथे शाखा सुरू करण्यात येणार असल्याचे सचिन यादव यांनी सांगितले. रोजगार निर्मिती हा के. बी. व गॅलेक्सी ग्रुपचा प्रमुख उद्देश असून, आतापर्यंत सुमारे दोन हजार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. येत्या २ वर्षात ५ हजार रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचे यावेळी यादव यांनी निदर्शनास आणून दिले. गॅलेक्सीचे संचालक हेमंत खलाटे यांनी आभार मानले.
02432
फलटण : गॅलेक्सी मल्टिस्टेट मल्टिपर्पज शाखेचे उद्घाटन करताना सचिन यादव, सुजाता यादव आणि इतर मान्यवर. (अशोक सस्ते : सकाळ छायाचित्रसेवा)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.