Aakash Gurkha 
पुणे

खेळ थांबला, पण सराव थांबत नाही 

प्रीतम पुरोहित

पुणे - सध्या जगभरात कोरोना विषाणूचे थैमान सुरु आहे. देश सुद्धा लॉकडाऊन केला आहे. या विषाणूमुळे क्रिडा क्षेत्रावर परिणाम झाला आहे. यात मुख्य म्हणजे स्पर्धा थांबल्या असल्यातरी खेळाडू मात्र आपला सराव चालू ठेवत आहेत. आकाश राष्ट्रीय बॉक्सर खेळाडू आहे. नुकत्याच यूरोप (विल्निअस लिथुआनिया) येथे झालेल्या स्पर्धेत त्याने दोन सुवर्ण पदक आपल्या नावे केले. 

सध्या जीवनावश्यक सेवा वगळता सारं काही बंद आहे. अश्या कठीण परिस्थिवर मात करून आपला नियमित सराव आकाश गुरखा याने सुरु ठेवला आहे. त्याने घरीच व्यायामाचे साहित्य बनविले, आणि बाजूच्या पार्किंग मध्ये आपला सराव सुरु ठेवला . दुसऱ्या कुमार गट आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग सर्बिया (२०१८) स्पर्धेचा पदक विजेता आकाश म्हणतो सराव थांबत नसतो. खेळडूंच्या जिद्दीपुढे परिस्थितीला ही हार पत्करावी लागते. 

पुण्यातील रामदूत सोसायटीच्या पार्किंग मध्ये गुरखा कुटूंब राहत आहे. दर महिन्यला येणारी उत्पनाची शाश्वती नाही. वडील वॉचमन. आकाशने अश्या परिस्थितीही जिद्द सोडली नाही. आई वडिलांनी दाखविलेल्या आपल्यावरील विश्वास त्याने सार्थ ठरविला. त्याने यशाची एक एक शिखरे पार केली. त्याचं कौतुक खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या "मन की बात" या कार्यक्रमात केलं आहे. 

नुकत्याच पार पडलेल्या खेलो इंडिया स्पर्धेत त्याने ब्रॉझ पदक पटकाविले. त्याआधी पुण्यातील स्पर्धेत रौप्य पदकाची कमाई केली. आकाशच्या चमकदार कामगिरीमुळे प्रभावित झालेल्या आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्युटने त्याला प्रशिक्षणाची तयारी दर्शविली. मात्र त्याची फुफुसे जन्मा:त जोडली असल्याने त्याला ए एस आय ची वैद्यकीय चाचणी पार करता आली नाही. पण त्याचे कौशल्य पाहून एएसआयच्या प्रशिक्षकांनी नागरी खेळाडूं म्हणून संधी दिली. 

वयाच्या नवव्या वर्षी खेळायला सुरुवात करणाऱ्या आकाशचे बॉक्सिंग मधील कौश्यल पाहून प्रशिक्षक उमेश जगदाळे यांनी त्याला एम आय जी एस क्लब मध्ये दाखल करून घेतले. रविवार पेठेतील बी आर अगरवाल शाळेत शिकत त्याने बॉक्सिंगचे वेड जपले. जगदाळेयांच्या मार्गदर्शनाखाली त्याने राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धेत घवघवीत यश मिळविले आहे. 

सध्या सगळीकडेच बंद आहे. मात्र आकाशने घरीच व्यायामाचे साहित्य बनविले. आणि त्याने त्याचा सराव सुरु ठेवला. लवकरच त्याने देशासाठी सुवर्ण पदक मिळवावे. आकाशने सराव थांबवला नाही याचही कौतुक आहे. 
- सावित्री गुरखा (आकाशाची आई)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT