ganapti visarjan 2023 of 95 thousand Ganpati idols in punecity on fifth day esakal
पुणे

Ganesh Visarjan 2023 : शहरात पाचव्या दिवशी सुमारे ९५ हजार गणपती मूर्तींचे विसर्जन

१३ हजार मूर्तींचे संकलन, महापालिकेकडून सव्वा लाख किलोचे निर्माल्य

सकाळ वृत्तसेवा

पुणे : गणेशोत्सवाच्या पाचव्या दिवशी भर पावसात नागरिकांनी विसर्जनासाठी घाटांवर गर्दी झाली होती. पाच दिवसांच्या गणपती विसर्जनाच्या दिवशी सुमारे ९५ हजार मूर्तींचे विसर्जन झाले. त्यामध्ये १३ हजार मूर्तींचे संकलन ही करण्यात आले. तसेच विसर्जनावेळी सुमारे सव्वा लाख किलो इतके मोठ्या प्रमाणात निर्माल्य देखील जमा करण्यात आले.

गणेशोत्सवाच्या पाचव्या दिवशी दुपारपर्यंत अनेक नागरिकांनी घराजवळील हौदामध्ये किंवा नदीपात्रातील हौदामध्ये गणपतीचे विसर्जन केले. मात्र दुपारनंतर मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली होती.

तरीही काही नागरिकांनी भर पावसात देखील मूर्तींचे विसर्जन करण्यास प्राधान्य दिले होते. दरम्यान, सायंकाळी पाऊस कमी झाल्यानंतर नागरिकांनी मोठ्या संख्येने घराबाहेर पडत मूर्तींचे विसर्जन केले.

महापालिकेच्या वतीने विसर्जनासाठी ठिकठिकाणी बांधलेल्या हौदांसह, लोखंडी टाक्‍या, काही प्रमाणात फिरत्या हौदांची व्यवस्था करण्यात आली होती. त्यानुसार, शनिवारी शहराच्या वेगवेगळ्या भागात सुमारे ९५ हजार ४१ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.

त्यामध्ये बांधलेल्या हौदांमध्ये १७ हजार ६६२, लोखंडी टाक्‍यांमध्ये ५९ हजार ३००, फिरत्या हौदांमध्ये ४ हजार २८७ इतक्‍या मूर्तींचे विसर्जन झाले. तर १३ हजार ७९२ मूर्ती संकलित करण्यात आल्या आहेत. अशा एकूण ९५ हजार ४१ मूर्तींचे भाविकांकडून विसर्जन करण्यात आले.

दरम्यान, दरवर्षी पाच दिवसांच्या गणपती विसर्जनाच्यावेळी मोठ्या प्रमाणात निर्माल्य गोळा होते. त्यानुसार, यंदा देखील पाचव्या दिवशी सुमारे १ लाख १९ हजार ९७२ किलो निर्माल्य गोळा करण्यात आले. तर आत्तापर्यंत १ लाख ३५ हजार ११२ किलो निर्माल्य महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी गोळा केले आहे. विसर्जनाच्यावेळी जमा होणाऱ्या निर्माल्यावर प्रक्रिया करून महापालिका त्यापासून खतनिर्मिती करते.

मूर्ती संकलनाला चांगला प्रतिसाद

नागरिकांकडून मूर्ती विसर्जन करण्याऐवजी मूर्ती दान करण्यास प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे महापालिकेकडून विसर्जनाच्या ठिकाणी घाटांवर मूर्ती संकलन करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येते. पाचव्या दिवशी १३ हजार ७९२ मूर्ती संकलित करण्यात आल्या असून गणेशोत्सव काळात आत्तापर्यंत १५ हजार ५५७ इतक्‍या मूर्ती महापालिकेकडून संकलित करण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : ''मीसुद्धा तो व्हिडीओ बघितला, पण...''; संजय गायकवाडांनी केलेल्या मारहाणीवर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Matru Suraksha Din 2025: मातृत्व अधिक सुरक्षित करण्यासाठी सरकार कोणत्या योजना राबवतंय? जाणून घ्या आजच!

बाबो! भाईजान लग्न करतोय? सलमानच्या 'त्या' पोस्टमुळे चर्चेला उधाण, नेटकरी म्हणाले...'दारु पिऊन काहीही...'

Latest Maharashtra News Live Updates: विदर्भात पावसाचा जोर कायम, पुरामुळे बंद झाले 'हे' मार्ग

UAE Golden Visa confusion: 23 लाखांत मिळतोय लाइफटाइम गोल्डन व्हिसा? युएई सरकारने दिलं स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT