पुणे

गांधीजींच्या हत्येनंतर तत्कालीन सरकारची अनास्था

CD

पुणे, ता. १८ : महात्मा गांधी यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर ते सुमारे २० मिनिटे घटनास्थळी पडून होते. त्यांना तातडीने रुग्णालयात नेले नाही, ही तत्कालीन सरकारची गांधीजींविषयी अनास्था होती, असा दावा सात्यकी सावरकर यांनी न्यायालयात केला. स्वातंत्र्यवीर सावरकर मानहानी खटल्याच्या उलटतपासणीदरम्यान त्यांनी सांगितले.
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी केल्याप्रकरणी सात्यकी सावरकर यांनी पुणे न्यायालयात मानहानीचा फौजदारी खटला दाखल केला आहे. विशेष न्यायाधीश अमोल शिंदे यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू आहे. राहुल गांधी यांचे वकील मिलिंद पवार यांनी सात्यकी सावरकर यांची उलटतपासणी घेतली. तक्रारदारांच्या वतीने ॲड. संग्राम कोल्हटकर यांनी काम पाहिले. या वेळी सात्यकी सावरकर यांनी सांगितले की, ‘‘त्यांचे आजोबा गोपाळ गोडसे आणि चुलत आजोबा नथुराम गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय कार्यकर्ते होते.’’
दिल्लीतील बिर्ला हाऊस येथे ३० जानेवारी १९४८ ला महात्मा गांधी यांची हत्या झाली होती. या खटल्यात नथुराम गोडसे, नारायण आपटे, विष्णू करकरे, मदनलाल पहावा, शंकर किस्तय्या, गोपाळ गोडसे, विनायक दामोदर सावरकर आणि डॉ. डी. एस. परचुरे आरोपी होते. त्यापैकी नथुराम गोडसे आणि नारायण आपटे यांना फाशी, तर गोपाळ गोडसे यांना जन्मठेपेची शिक्षा झाली होती, अशी माहिती सात्यकी सावरकर यांनी न्यायालयात दिली.
सात्यकी सावरकरांचे वकील ॲड. कोल्हटकर यांनी या प्रश्नांवर आक्षेप घेतला. हा खटला महात्मा गांधी यांच्या मृत्यूशी किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडित नसल्याने असे प्रश्न विचारता येणार नाहीत, असे त्यांनी नमूद केले. न्यायालयाने हा आक्षेप अंतिम निकालावेळी निकाली काढण्याचे स्पष्ट केले आहे. पुढील उलटतपासणी १ सप्टेंबरला होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrashekhar Bawankule: बॅंकांनी कर्जवसुलीसाठी तगादा लावू नये: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे; शेतकऱ्याने जीवन संपवल्यास जबाबदार धरणार

Latest Marathi News Live Update : पुण्यात शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद कुणाकडे? २४ नोव्हेंबरला होणार फैसला!

ढिंग टांग : गर्रर्र...गर्रर्र...गर्जना!

Maharashtra Drought: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळी मदतीला दोन हेक्टरची मर्यादा, तीन हेक्टरचे पंचनामे, राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर

स्मार्ट सल्ला : इच्छापत्राची समंजस अंमलबजावणी

SCROLL FOR NEXT