gandhi jayanti no change in world without Gandhi thoughts Dr Saptarishi pune Sakal
पुणे

Pune News : गांधी विचारांशिवाय जगाला गत्यंतर नाही - डॉ. सप्तर्षी

राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताहास प्रारंभ

सकाळ वृत्तसेवा

कोथरूड : पुण्यात गांधी कळला तर तो जगभर कळेल, पोचेल म्हणून आम्ही येथून गांधी प्रसार, प्रचार आणि गांधी विचार जागृतीचे काम करीत आहोत, हे काम खरंतर सर्व पक्षांनी करायले हवे कारण गांधी विचारांशिवाय जगाला गत्यंतर नाही.कॉग्रेसने गांधी विचार सोडल्यानेच त्यांची हार झाली.

यापुढे कॉग्रेसने गांधी विचारांच्या आधाराने जनतेला एकत्र करून त्यांना रस्त्यावर उतरवल्या खेरीज फॅसिझम सरकार पाडता येणार नाही. असे मत महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र गांधी स्मारक निधीतर्फे आयोजित 'राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताहा'चे उद्घाटन रविवारी सायंकाळी झाले. गांधी सप्ताह आयोजनाचे हे १२ वे वर्ष आहे. महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी , विश्वस्त प्रा.एम.एस.जाधव, डॉ.शिवाजीराव कदम, अभय छाजेड, ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे, रतनलाल सोनग्रा, संदीप बर्वे, युवक क्रांती दलाचे कार्यवाह जांबुवंत मनोहर, शहराध्यक्ष सचिन पांडुळे,अप्पा अनारसे उपस्थित होते.

डॉ. सप्तर्षी म्हणाले,'धर्म राजकारण्यांच्या हातात गेला आहे, तो भक्तांच्या ही हातात राहिला नाही. धर्म आणि राजकारणाचा तसा काही संबंध नाही, पण आजकाल राजकीय लोक निवडून येण्यासाठी आणि सत्ता मिळविण्यासाठी धर्मावर अतिक्रमण करून धर्म हातात घेत आहेत, आणि धर्मा धर्मात वाद निर्माण करीत आहेत.

सर्व धर्मांचा अंतिम संदेश ही जगात शांतता नांदो हाच आहे. पुढच्या पिढ्यांमध्ये कुठल्याही धर्माविषयी कटुता पोहोचू नये यासाठी सर्व धर्म प्रार्थना आयोजित करून गांधींनी सांगितलेले सत्य आणि अहिंसा धर्म पुढील पिढीला सांगणे आवश्यक आहे सर्वधर्मप्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

संविधान प्रस्तावना वाचन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संदीप बर्वे यांनी केले. कुमार सप्तर्षी यांच्या "धर्मा बद्दल" या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन अभय छाजेड यांच्या हस्ते झाले. शुभांगी मुळे यांचे पसायदान झाले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT