पुणे

सातारा डीजेने दणाणला

CD

कर्णकर्कश गाण्यांनी दणाणला राजपथ
साताऱ्यात गणेश आगमन सोहळ्याचा उत्‍साह शिगेला; महिलांचाही सहभाग

सातारा, ता. ११ : शहरातील राजपथावर दोन दिवसांपासून पारंपरिक वाद्यांचा गजर, ढोल-ताशांच्या दणदणाटात विविध गणेशोत्सव मंडळांनी गणरायाची वाजतगाजत मिरवणूक काढत आगमन सोहळा साजरा केला. मात्र, आगमन सोहळ्याच्या आजच्या दिवशी चित्र काहीसे पालटलेले पाहायला मिळाले. आज विविध मंडळांनी ध्वनिवर्धकांना (डीजे) विशेष प्राधान्य दिल्याचे दिसून आले.
दरम्यान, अचानक बदललेल्या आगमन सोहळ्याच्या स्वरूपावर नागरिकांकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. एका बाजूला डीजेच्या तालावर थिरकणाऱ्या युवकांचा जोश कायम होता, तर दुसऱ्या बाजूला कानठळ्या बसणाऱ्या आवाजामुळे नागरिकांना नाहक त्रासाचा सामना करावा लागला. या बरोबरच काही मंडळांच्या मिरवणुकांमध्ये ढोल-ताशांचा गजर होता. आजच्या मिरवणुकांमध्ये महिला वर्ग पारंपरिक पोशाखांसह फेटे परिधान करून सहभागी झाल्या होत्या. शहरातील हत्तीखाना गणेशोत्सव मंडळ, वीरशैव कक्कया गणेशोत्सव मंडळ, लोकमान्य बाल गजानन गणेशोत्सव मंडळ, करंजे येथील कर्तव्य ग्रुप, भोसलेनगर गणेशोत्सव मंडळ, नकाशपुरा गणेशोत्सव मंडळ, गडकरी आळीचा राजा मंडळ यासह अखिल भाजी मंडई गणेशोत्सव आदी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणरायाचा आगमन सोहळा धडाक्यात काढण्यात आला.
.....................................
चौकट
मंडळांनी आज, उद्या मिरवणूक टाळावी
नागरिकांना गणेशोत्सवाची खरेदी करता यावी, व्यावसायिकांना व्यवसाय करता यावा, वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी मंडळांनी १२ व १३ सप्टेंबरला बाजारपेठेतून मिरवणूक काढू नये, असे आवाहन सातारा सार्वजनिक गणेशोत्सव समन्‍वयक समितीची अध्यक्ष महेश साळुंखे आणि उपाध्यक्ष अभिजित बारटक्के यांनी केले आहे.
...................................
PNE26W48981
सातारा : शहरातील विविध गणेशोत्सव मंडळांनी शुक्रवारी दिमाखात काढलेली गणरायाची आगमन मिरवणूक. (प्रमोद इंगळे : सकाळ छायाचित्रसेवा)
-----------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manchar Accident : दोन भीषण अपघातांत खेड तालुक्यातील दोघांचा व आंबेगाव तालुक्यातील एकाचा मृत्यू; एक गंभीर जखमी

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर....

आकाश पाळण्यात महिलेचे केसं अडकले, केसांसह चामडी निघाली; तांन्हा पोळ्याच्या यात्रेत थरारक घटना

Kaygaon News : गोदावरीत उडी घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या अल्पवयीन मुलाचे पोलिसांनी वाचवले प्राण

Sangli Mahanagarpalika Bharti : महापालिकेत भरतीचा मार्ग मोकळा; टाटा कन्सल्टन्सीला दिला कंत्राटाचा कार्यादेश, 82 रिक्त पदांपैकी 41 पदांसाठी भरती

SCROLL FOR NEXT