Ganesh bidkar is new leader of the house in Pune Municipal Corporation 
पुणे

पुणे महापालिका सभागृह नेतेपद गणेश बिडकर यांच्याकडे 

सकाळवृत्तसेवा

पुणे - पुणे महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने पदाधिकारी बदलण्यास सुरुवात केली असून, पहिल्या टप्प्यात सभागृहनेतेपदावर आता धीरज घाटे यांच्याऐवजी नगरसेवक गणेश बिडकर यांची नेमणूक करण्याचा निर्णय पक्षनेतृत्वाने गुरुवारी घेतला. तसे पत्रही बिडकर यांना दिले. पक्षाच्या नगरसेवकांची शुक्रवारी (ता. ११) बैठक होईल आणि त्यानंतर बिडकर यांच्या नावाची अधिकृत घोषणा होईल. मात्र, अन्य पदाधिकारी बदलण्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महापालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर सत्तेतील महत्त्वाच्या पदावरील व्यक्ती बदलली आहे. त्यानिमित्ताने महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच स्वीकृत नगरसेवकाकडे सभागृहनेतेपद जाणार आहे. महापालिकेतील सत्तेच्या पहिल्या अडीच वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर महापौर, उपमहापौर आणि सभागृहनेतेपद बदलण्यात आले. त्यातून साधारपणे वर्षभरापूर्वी महापौरपद मुरलीधर मोहोळ, उपमहापौर म्हणून सरस्वती शेंडगे आणि सभागृहनेतेपद घाटे यांच्याकडे आले. मात्र, या पदाधिकाऱ्यांना वर्षभरासाठीच संधी असल्याचे सांगत, भाजपमधील इच्छुकांनी पदाधिकारी बदलण्याचा आग्रह नेतृत्वाकडे धरला होता. त्यामुळे पदाधिकारी बदलाबाबत उत्सुकता होती. शेवटी सभागृहनेते म्हणून बिडकर यांच्या नावाला पसंती मिळाल्याचे पक्षांतील नेत्यांनी सांगितले.

स्वीकृत नगरसेवकाला सभागृहात मतदानाचा अधिकार नसतो. अशा सदस्याला पद मिळत नाही, असे ज्येष्ठ नगरसेवक सांगत आहेत. तर, स्वीकृत नगरसेवकाची कोणत्याही  पदावर नेमणूक होऊ शकत नाही, असा कायदा नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

SCROLL FOR NEXT