पुणे

मंगलमूर्तीच्या आगमनाने मांगल्य

CD

पिंपरी, ता. १४ : भाद्रपद शुद्ध चतुर्थीचा मुहूर्त...सर्वांचीच लगबग.. प्रसन्न वातावरण...मंगलवाद्यांचे सूर...नजरेत भराव्यात इतक्या सुंदर रांगोळ्या...दाराला तोरण..गृहिणी, चिमुकले आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांची लगबग..ढोल-ताशांचा गगनभेदी आवाज...अशा पारंपरिक आणि अत्यंत उत्साह-भक्तिभावाच्या वातावरणात गणरायाचे सोमवारी घरोघरी आगमन झाले आणि साऱ्यांनीच ‘‘गणपती बाप्पा मोरया...मंगलमूर्ती मोरया’’चा जयघोष केला.

आगमनानिमित्त गणरायाच्या भव्य आणि देखण्या मूर्तींची ढोल-ताशांच्या गजरात ठिकठिकाणी मिरवणूक काढण्यात आली. श्रींचे आगमन हे प्रत्येकासाठी अत्यंत आनंद, उत्साह आणि मांगल्याचे पर्व असते. यंदा बारा दिवसांच्या गणेशोत्सवासाठी गेल्या काही दिवसांपासून जय्यत तयारी सुरू होती. त्यानंतर मूर्ती आणण्यासाठी सार्वजनिक मंडळांनी आणि भाविकांनी पहाटेपासूनच बाजारपेठेत गर्दी केली. हाती गणेशाची मूर्ती घेऊन ‘मोरया...’चा अखंड जयघोष करत टाळ्या किंवा छोटी ढोलकी वाजवत लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वजण आनंदाने घरी जात होते. सजवलेल्या मखरात नक्षीदार चौरंगावर श्री गणेशाची मूर्ती विराजमान करून विधिवत पूजा, अभिषेक, तसेच मंत्रोच्चारात घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांत प्रतिष्ठापना करण्यात आली. मोदक, लाडू आणि फळांचा नैवेद्य दाखवून मनोभावे आरती करण्यात आली. गणेशाला प्रिय असणाऱ्या उकडीच्या मोदकांचा नैवेद्य दाखवून सहकुटुंब आरती करण्यात आली. यंदा पर्यावरणपूरक मूर्तींकडे नागरिकांचा कल अधिक पाहायला मिळाला. या ज्ञान आणि आनंददायी उत्सवासाठी संपूर्ण वातावरण भक्तिमय झाल्याचे पाहण्यास मिळाले.

चैतन्यमय ऊर्जा
गणेशाच्या स्वागतासाठी घरातल्या चिमुकल्यांपासून ते आजी-आजोबांपर्यंत प्रत्येक जण स्वतःला विसरून गणरायाच्या उत्सवात सहभागी झाला आहे. श्रींच्या आगमनामुळे घरात आणि परिसरात एक वेगळीच चैतन्यमय ऊर्जा अनुभवास मिळाली. गणेशोत्सवाचा सर्वाधिक आनंद लहान मुलांमध्ये पाहायला मिळाला. गणराय घरात विराजमान होताच मुलांनी टाळ्या वाजवून आणि नाचून आनंद व्यक्त केला.

महिलांचा पारंपरिक साज
गणरायाच्या आगमनानिमित्त महिलांनी पारंपरिक पोशाख आणि दागिने परिधान करत श्री गणेशाचे स्वागत केले. यानिमित्त घराघरांमध्ये तसेच सार्वजनिक मंडळांमध्ये महिलांचा अस्सल महाराष्ट्रीय पारंपरिक मेकअप आणि लुक आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. ‘पेशवाई’ किंवा ‘मस्तानी स्टाइल’ नऊवारी साडी नेसून, त्यावर मॅचिंग खण किंवा डिझायनर ब्लाऊज परिधान करून महिला गणेशाची आरती करताना दिसल्या. घरोघरी चाललेली नैवेद्याची तयारी, आरती आणि ढोल-ताशांच्या तालावर नऊवारी साडीत फुगड्या खेळणाऱ्या महिलांमुळे गणेशोत्सवात उधाण आले होते.

सार्वजनिक मंडळांकडून भव्य मिरवणुका
विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी भव्य आणि देखण्या मूर्तींची ढोल-ताशांच्या गजरात, गुलाल उधळत आणि वाजत-गाजत गणेशाच्या प्रतिष्ठापनेसाठी भव्य मिरवणुका काढल्या. मंडळांमध्ये भव्य देखावे, आकर्षक रोषणाई आणि विस्तीर्ण मंडप उभारण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी पारंपरिक लेझीम पथके आणि ढोल-ताशा पथकांच्या वादनाने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. शहरातील गणपतींच्या प्रमुख मंडळांच्या गणेशाची प्रतिष्ठापना दुपारी बारा वाजेपर्यंत करण्यात आली. यंदा अनेक मंडळांनी सामाजिक संदेश देणारे आणि ऐतिहासिक देखावे उभारले आहेत.

- दिवसभरातील क्षणचित्रे
घरोघरी ‘गणपती बाप्पा..मोरया’’चा गजर
पूजा, अभिषेकासह मंत्रोच्चारात प्रतिष्ठापना
ढोल-ताशांचा गजर अन् भक्तांचा उत्साह
घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये प्रतिष्ठापना
श्रींच्या आगमनामुळे घरात चैतन्यलहरी
पारंपरिक वेशभूषेत महिलांच्या सहभागाने संस्कृतीचे दर्शन
ढोल-ताशांच्या तालावर नऊवारी साडीत फुगड्या
मंडळांकडून विस्तीर्ण मंडप, देखावे, आकर्षक रोषणाई
ऐतिहासिक, पौराणिक, सामाजिक संदेशाचे देखावे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPO Alert: NSE सह 5 IPO येणार! कोणता IPO देऊ शकतो सर्वाधिक Listing Gain? NSE IPO चा GMP किती?

सारखेनंतर आता ताटातली पोळीही महाग; एका महिन्यात गव्हाच्या दरात तब्बल २०० रुपयांची वाढ

Ganesh Chaturthi 2026: आपण गणपती बाप्पा म्हटलं की ‘मोरया’ का म्हणतो? या जयघोषामागे आहे एका गणेशभक्ताची कहाणी

Marathi News Live Updates : तलावातून निघते गणरायाची पालखी; रायगडच्या साले गावातील अनोखी परंपरा

Ganesh Chaturthi 2026: बाप्पाच्या चरणांशी उंदीर का असतो? उंदीर मामा कसा बनला गणपती बाप्पाचे वाहन? जाणून घ्या रंजक कथा!

SCROLL FOR NEXT