तळेगाव दाभाडे, ता. १३ : सार्वजनिक गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यासाठी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेने शहरात नऊ ठिकाणी गणेशमूर्ती विसर्जन व मूर्तीदान केंद्रे उभारली आहेत. नागरिकांनी तलाव, विहीर, नदी तसेच अन्य नैसर्गिक जलस्रोतांमध्ये मूर्ती विसर्जन न करता नगरपरिषदेच्या केंद्रांचा वापर करावा, असे आवाहन मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी केले आहे.
घरी गणेशमूर्तीचे विसर्जन करू इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी नगरपरिषदेच्या वतीने नगरपरिषद कार्यालय, डी मार्टमागील नगरपरिषद संकुल आणि संत ज्ञानेश्वर प्राथमिक शाळा क्रमांक ६ या तीन ठिकाणी अमोनिअम बायकार्बोनेट पावडरचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. गणेशोत्सव काळात निर्माल्य संकलनासाठी आरोग्य विभागामार्फत दररोज ट्रॅक्टरद्वारे निर्माल्य कलश फिरविण्यात येणार आहेत. तसेच मूर्तीदान व विसर्जन केंद्रांवरही निर्माल्य कलश ठेवण्यात आले आहेत. नागरिकांनी तसेच गणेशोत्सव मंडळांनी निर्माल्य इतरत्र न टाकता कलशातच टाकावे, असे आवाहन नगरपरिषदेने केले आहे.
मूर्तीदान व विसर्जन केंद्रे
नथूभाऊ भेगडे पाटील शाळेचे मैदान, गाव तळे-अमर खडकेश्वर मंदिराजवळ, गाव तळे परिसर, खंडोबा मंदिराजवळ, कै. पै. विश्वनाथराव भेगडे पाटील क्रीडा संकुलासमोर, श्री शिवशंभू स्मारकासमोर, यशवंतनगर (गोल ग्राउंड), संत ज्ञानेश्वर प्राथमिक शाळा क्रमांक ६ आणि डी मार्टशेजारील नगरपरिषद संकुल या ठिकाणी केंद्रे उभारण्यात आली आहेत. गणेशोत्सवासंदर्भातील समस्या किंवा अडचणींसाठी नागरिकांनी ९८९०६१६०८९ या क्रमांकावर संदेशाद्वारे संपर्क साधावा, असे नगरपरिषदेने कळविले आहे.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.