देखावे उभारणीच्या कामांना वेग
सातारा, ता. १६ : सातारा शहरासह परिसरातील विविध मंडळांत गणरायाची प्रतिष्ठापना झाल्यानंतर पदाधिकारी, कार्यकर्ते आता देखावे आणि सजावटीच्या कामात गुंतले आहेत. भव्यदिव्य देखावे, सजावट साकारण्याची परंपरा असणाऱ्या अनेक मंडळांनी यंदाही परंपरेनुसार असेच देखावे साकारण्याचा चंग केला आहे.
तिथीनुसार सोमवारी सर्वत्र लाडक्या गणरायाचे आगमन झाले. घरगुती तसेच मंडळांच्या मूर्ती माेठ्या उत्साहात आणि जल्लोषी वातावरणात नेण्यात आल्या. गणेशाच्या आगमनाची चाहुल मंडळांना एक महिना अगोदरच लागलेली असते. मूर्तीची उंची, रचना या बाबींची चर्चा करत असतानाच साकारायचे देखावे, सजावटीवर देखील आयोजित बैठकीत खल होत असतो. विविध बाजू, बाबी, बारकावे यांची सांगड घालत देखाव्याचा प्रसंग व इतर मांडणी ठरवण्यात येते.
घरगुती गणपती आणि गौराईचे विसर्जन झाल्यानंतर नागरिक सार्वजनिक मंडळांच्या मूर्ती व देखावे पाहण्यासाठी घराबाहेर पडत असतात. यंदा शनिवारी घरगुती गणपती, गौराईचे विसर्जन होणार असल्याने बहुतांश मंडळांना त्यादिवसापर्यंत देखावे सज्ज करावे लागणार आहेत. यामुळे देखावे उभारणी व सजावटीच्या कामांना वेग आला आहे. सध्या या कामासाठी मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते दिवसरात्र झटत आहेत.
..................
50174
सातारा : बालविकास मंडळाच्या देखाव्याचे सुरू असलेले काम. (प्रमोद इंगळे : सकाळ छायाचित्रसेवा).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.